Monday, September 9, 2024
Home टॉलीवूड काळीज तोडणारी बातमी! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

काळीज तोडणारी बातमी! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

चित्रपटसृष्टीतून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेत्री चित्रा यांचे शनिवारी (२१ ऑगस्ट) निधन झाले आहे. चित्रा यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्या अवघ्या ५६ वर्षांची होत्या. चित्रा यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकार त्यांच्या निधनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.

चित्रा यांनी जवळपास १०० पेक्षा अधिक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. चित्रा यांना दिग्दर्शक केएस रवीकुमार यांच्या ‘चेरन पांडियान’ आणि पांडियाराजन यांच्या ‘गोपाला गोपाला’मधील अभिनयासाठी ओळखले जाते. (South Indian Actress Chithra Passes Away Due To Heart Attack)

श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत चित्रा यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “विविध भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मल्याळम अभिनेत्री चित्राचे चेन्नई येथे वयाच्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.”

याव्यतिरिक्त दिग्दर्शक मनोबाला यांनीही चित्रा यांच्या निधनानंतर ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “वाईट बातमी, अभिनेत्री चित्राचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर चेन्नईच्या सालिग्रामम येथे सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.” यासोबतच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये मोबाईल नंबरचाही समावेश केला आहे.

विशेष म्हणजे नेल्लनई जाहिरात व्हायरल झाल्यानंतर त्या जाहिरातीला नेल्लनई चित्रा असे नाव देण्यात आले होते. त्यांनी अनेक शानदार चित्रपटात दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले होते.

चित्रा यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड यांसारख्या अनेक दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी मोहनलाल आणि प्रेम नजीर यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या निधनाने त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अपना टाइम आएगा’ म्हणत राणीने चॅटर्जीने शेअर केला व्हिडिओ; नेटकरी म्हणतायेत, ‘अजून किती बारीक व्हायचंय’

-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा