सुपरस्टार अभिनेत्रीने केला शाळेच्या शिपायाबरोबर फनी डान्स, सोशल मीडियावर झाली एकच चर्चा


निक्की गिलरानी हे नाव तुम्हाला जरी नवीन वाटत असले तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वांनाच ओळखीचे आहे. निक्की साऊथ सिनेसृष्टीत प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा. ती खासकरुन तामिळ आणि मल्याळम सिनेमात काम करते. आपल्या अभिनयाने निक्कीने संपूर्ण साऊथ इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली आहे.

सध्या निक्की तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. यातच तिने तिचा सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ती सध्या तिच्या सिनेमाचे एका शाळेत शूटिंग करत आहे. तिथे ती त्या शाळेच्या शिपायाला भेटली. शूटिंगच्या व्यापातही तिने त्या शिपायासोबत आनंदाचे क्षण घालवले आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणले आहे.

निक्कीने हा व्हिडिओ शेयर करताना सुंदर कॅप्शन दिले आहे. ती लिहिते, ” आयुष्यात आपण आपल्याला पाहिजे तसा आनंद कधीच साजरा करू शकत नाही. मात्र आता जर इथे आहोत, तर डान्स पार्टी तर नक्कीच करू शकतो.” या व्हिडिओत निक्की मजेशीर डान्स करताना दिसत आहे. तिने शिपायाच्या डान्स स्टेप्स फॉलो करत फनी डान्स केला आहे.

निक्कीच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे झाले तर, ती रामबाला यांच्या ‘इडियट’ आणि ‘राजा वमसम’ सिनेमात झळकणार आहे. निक्कीने आतापर्यंत तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये जवळपास ३० सिनेमामध्ये काम केले आहे. तिने २०१४ साली मल्याळम सिनेमा १९८३ मधून अभिनयात एन्ट्री घेतली होती. निक्की २०१९ मध्ये आलेल्या धमाका सिनेमात अखेरची दिसली होती. तिला तिच्या अभिनयामुळे अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.