Monday, July 1, 2024

किती झालंय साई पल्लवीचं शिक्षण? धर्मावर केलेल्या ‘या’ विधानामुळे आहे चर्चेत

धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराने संपूर्ण देशातील वातावरण बिघडवले आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने (Sai Pallavi) याच प्रकरणावर एक कमेंट केल्यानंतर ती वादात सापडली आहे. जाणून घेऊया की, साई पल्लवीच्या वादात अडकण्यामागचे खरे कारण काय आहे आणि तिने किती शिक्षण घेतले आहे?

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, साई पल्लवीने देशात धर्माच्या नावावर होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता. यादरम्यान, तिने काश्मिरी पंडितांच्या पलायनाची तुलना मॉब लिंचिंगशी केली, त्यानंतर अभिनेत्री वादात सापडली. (south indian actress sai pallavi biography education qualification)

काय म्हणाली साई पल्लवी?
साई पल्लवी म्हणाली, “काश्मिरी पंडितांना त्यावेळी कसे मारले गेले, हे काश्मीर फाईल्सने दाखवले. जर तुम्ही हा मुद्दा धार्मिक संघर्ष म्हणून घेत असाल, तर अलीकडेच एका मुस्लिमावर गायी वाहून नेणारे वाहन चालवत असताना हल्ला झाल्याची घटना घडली आहे. लोकांनी जय श्री रामचा जयघोष केला. तेव्हा जे घडले आणि आता जे घडत आहे, त्यात फरक कुठे आहे?”

सोशल मीडियावर ट्रोल होतेय साई पल्लवी
साई पल्लवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर दाखवलेल्या अत्याचाराची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे. साई पल्लवीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काही लोक साई पल्लवीला सपोर्ट करत आहेत, तर अनेक लोक तिच्यावर भडकले आहेत. साई पल्लवीने तिच्या मुलाखतीत म्हटले आहे की, “मी तटस्थ वातावरणात वाढले आहे. मी लेफ्ट विंग आणि राइट विंग बद्दल खूप ऐकले आहे, पण मी कोणाला योग्य की चूक हे सांगू शकत नाही.”

किती शिक्षित आहे साई पल्लवी
अभिनेत्री साई पल्लवीने तिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस केले आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात न जाता तिने अभिनयाची निवड केली आणि यश संपादन केले. तसेच, तिच्या दमदार अभिनयाने ती आज खूप लोकप्रिय आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा