Saturday, June 29, 2024

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

कोरियन सिनेमातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. कोरियन ड्रामा अर्थात के ड्रामाची स्टार अभिनेत्री जंग चाई यूलचे अवघ्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या जवळच्या व्यक्तीने ही निधनाची बातमी सांगितली आहे. ११ एप्रिलला तिचे दुःखद निधन झाले. अभिनेत्रीच्या एजेंसीने देखील तिच्या निधनाची बातमी दिली आहे. मात्र तिच्या मृत्यूचे कारण त्यांनी सांगितलेले नाही. मुख्य म्हणजे ती तिच्या घरात मृतावस्थेत आढळली आहे.

जंग चाई युलच्या टीमने सांगितले की, “आम्ही तुम्हाला एक वाईट बातमी सांगण्यासाठी आलो आहोत. अभिनेत्री चाई युलचे निधन झाले आहे. तिचे अंतिम संस्कार तिच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार खासगीमध्ये केले जणार आहे. आशा आहे, की तुम्ही चवीसाठी प्रार्थना कराल. चाई तिच्या प्रभावी अभिनयासाठी ओळखली जायची. तिच्या आत्म्याला शांती मिळो.”
त्यांनी पुढे म्हटले की, “आपली चाई खूपच मेहनती होती. एक अभिनेत्री म्हणून ती खूपच अद्भुत होती. तिच्याबद्दल व्यक्त होण्यासाठी शब्द देखील कमी आहे. ११ एप्रिल रोजी तिचे निधन झाले आहे.”

जंग चाई यूलचा जन्म ४ सप्टेंबर १९९६ रोजी झाला होता. तिने तिच्या करियरची सुरुवात २०१६ साली कोरियन मॉडेलिंग शो डेविल्स रनवेपासून केली होती. त्यानंतर २०१८ साली तिने दीपसोबत तिच्या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढे तिने जोंबी डिटेक्टिव आणि आय व्हॅव नॉट डन माय बेस्ट स्टिल या चित्रपटांमध्ये काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी

भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा