Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा ‘या’ दाक्षिणात्य सौंदर्यवतींच्या खासगी फोटोंनी इंटरनेटवर उडवली खळबळ, नयनताराही आहे यादीत सामील

‘या’ दाक्षिणात्य सौंदर्यवतींच्या खासगी फोटोंनी इंटरनेटवर उडवली खळबळ, नयनताराही आहे यादीत सामील

‘पुष्पा: द राइज’, ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘आरआरआर’ सारख्या सर्वोत्कृष्ट दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी प्रेक्षकांना वेड लावले आहे. आता सगळेच साऊथ इंडस्ट्रीचे कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडप्रमाणे साऊथ इंडस्ट्रीतील स्टार्सही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेणे आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की, बॉलिवूडप्रमाणेच दक्षिणेतील काही स्टार्सही वादात सापडले आहेत. आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत, ज्यांच्या खासगी फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती.

नयनतारा (Nayanthara)
नयनतारा ही साऊथ सिनेमाची लेडी सुपरस्टार आहे, जी सध्या दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नयनताराचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये नयनतारा तिच्या एक्स बॉयफ्रेंड सिम्बूसोबत लिपलॉक करताना दिसली. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (south stars controversy)

त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan)
त्रिशा कृष्णन ही एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे, जी ‘खट्टा-मीठा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. या अभिनेत्रीचा एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

रंजीता (Ranjeeta)
अभिनेत्री रंजीताचे नाव सेक्स स्कँडलमध्ये आले होते. अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये रंजीता आणि स्वामी नित्यानंद आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते. मात्र, रंजीताने या फोटोंवर आपले स्पष्टीकरण दिले होते. तो फोटोत ती नसल्याचा दावा तिने केला होता.

अँड्रिया जेरेमिया आणि अनिरुद्ध रविचंदर
अँड्रिया जेरेमिया आणि अनिरुद्ध रविचंदर हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहेत. दोघांचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यामध्ये दोघे लिपलॉक करताना दिसत होते. मात्र, फोटो व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच दोघांचे ब्रेकअप झाले.

हे देखील वाचा