संपूर्ण देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केले आहे. देशातील स्थिती ही खूपच गंभीर झाली आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच सोयी सुविधांचा पुरवठा वेळेवर होत नाहीये. त्यामुळे नागरिकांपासून ते शासनापर्यंत सगळेच चिंतेत आहे. देश या संकटातून कधी बाहेर पडेल याची सर्वजण वाट पाहत आहे. अनेकजण त्यांना जमेल तशी मदत करत आहेत. अनेक कलाकारांचा देखील यात समावेश आहे. आता तामिळनाडू वरून अशी बातमी आली आहे की, अभिनेता थाला अजित कुमार हा कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी राज्यातील जनतेला सांगितले होते की, या कोरोनाची लढाई लढण्यासाठी ज्यांना शक्य होईल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रक्कम जमा करावी. अजित कुमारने राज्याला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 25 लाख रुपये दान केले आहेत. अजित कुमारचे मॅनेजर सुरेश चंद्र यांनी शुक्रवारी (१४ मे) ट्विटरवरून ही माहिती दिली आहे की, अजित यांनी त्यांच्या बँकेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत.
Shri Ajith kumar had donated twenty five lakhs to the Chief minister relief fund today via bank transfer.
— Suresh Chandra (@SureshChandraa) May 14, 2021
या आधी अभिनेता सूर्या आणि सिवकुमार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक कोटी रुपये जमा केले आहेत. दिग्दर्शक एआर मुरुगादौस आणि उदय निधीस्टॅलिन यांनी मुख्यमंत्री राहत कोषमध्ये 25 लाख रुपये दान केले आहेत. यासोबतच अनेक कलाकारांनी मदत केली आहे.
थाला अजितच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘वलिमई’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अजित एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘एच विनोद’ हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाची संपूर्ण टीम विदेशात जाऊन या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होणार होते, पण कोरोना महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट
-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर
-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल