Saturday, June 29, 2024

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस हा विषाणू खूप वेगाने संक्रमण करत आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या लाखोंमध्ये वाढत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देत आहेत. तरीही नागरिकांनी सगळ्या सूचनांचे पालन न केल्याने आ महाताराष्ट्र सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी पर्यायाने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जणसामान्यांसोबत अनेक कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. अशातच एक बातमी हाती आली आहे की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याला कोरोनाची लागण झाली आहे.

अल्लू अर्जुनने त्याच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती दिली आहे की,‌ त्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना विनंती केली आहे की, तुम्ही जिथे कुठे आहात तिथे सुरक्षित रहा. माझी चिंता करू नका.

अल्लू अर्जुनने ट्विट केले आहे की, “नमस्कार सगळ्यांना!! माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की, जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी नक्की करून घ्या. माझी काळजी करू नका. मी ठीक आहे. घरी राहा सुरक्षित राहा.” अल्लू अर्जुनचे सगळे चाहते त्याला कमेंट करून ‘लवकर बरा हो’, ‘काळजी घे,’ असे सांगत आहेत. त्याचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी प्रमाणेच बॉलिवूडमध्ये देखील खूप चाहते आहेत.

अल्लू अर्जुन मागील काही दिवसांपासून त्याच्या ‘पुष्पा’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. त्याच्या या चित्रपटाचा टिझर देखील प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांना त्याचा हा टिझर खूपच आवडला आहे. परंतु आता जेव्हा अल्लू अर्जुनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे या चित्रपटाची शूटिंग थांबवली आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अल्लू अर्जुनसोबत त्याचे वडील अल्लू अरविंद हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. तरीही त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर

-दिवंगत अभिनेते इरफान खान आधीच समजले होते मरणार आहे, शेवटच्या वेळी मुलाला म्हटले असे काही, तुम्हालाही येईल रडू

-भारीच ना भावा! ‘बिग बॉस १४’नंतर राहुल वैद्यच्या मानधनात वाढ, ‘खतरों के खिलाडी’त एका एपिसोडसाठी घेणार सर्वाधिक रुपये

हे देखील वाचा