Friday, June 13, 2025
Home साऊथ सिनेमा दाक्षिणात्य सुपरस्टार ‘महेश बाबू’ कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

दाक्षिणात्य सुपरस्टार ‘महेश बाबू’ कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. चित्रपटसृष्टीतही कोरोनाने पुन्हा आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) हा देखील कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर, एकच खळबळ उडाली आहे.

ट्विटरवर दिली माहिती
ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत, महेश बाबूने चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, “माझ्या सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना…सर्व आवश्यक खबरदारी घेऊनही, मी सौम्य लक्षणांसह कोविड – १९ साठी पॉझिटिव्ह आलो आहे. मी स्वतःला घरी विलगीकरणात ठेवले आहे आणि वैद्यकीय मार्गदर्शनाचे पालन करत आहे.” (south superstar tested positive for covid 19)

चाहत्यांना केले आवाहन
चाहत्यांना आवाहन करत महेश बाबू म्हणाला, “माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. लसीकरण न केलेल्या प्रत्येकाला मी ताबडतोब लस घेण्याचे आवाहन करतो. कारण यामुळे गंभीर लक्षणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होतो. कृपया कोविड नियमांचे पालन करा आणि सुरक्षित रहा.”

महेश बाबूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, तो लवकरच ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटात दिसणार आहे. महेश बाबूने या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा