Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड कधीकाळी चॉकलेट-चिंगम आणि कॅसेट विकायचे मधुर भांडारकर, स्वत:वर विश्वास ठेवल्याने आज आहेत सुपरहिट दिग्दर्शक

कधीकाळी चॉकलेट-चिंगम आणि कॅसेट विकायचे मधुर भांडारकर, स्वत:वर विश्वास ठेवल्याने आज आहेत सुपरहिट दिग्दर्शक

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे शून्यातून पुढे आले आहेत. प्रत्येकाच्या यशामागे त्याने केलेला एक खडतर जीवन प्रवास असतो. सुख ही अशी गोष्ट आहे ज्याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागते. बॉलिवूड इंडस्ट्रीत असेच एक कलाकार आहेत, ते म्हणजे मधुर भांडारकर होय. त्यांनी दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर, निर्माते अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी इंडस्ट्रीत खूप नाव मिळवले आहे आणि यामागे अपार कष्टही घेतले आहेत. शुक्रवारी (दि. 26 ऑगस्ट) ते त्यांचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया, त्यांचा खडतर प्रवास.

मधुर भांडारकर यांचा जीवनप्रवास
बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि नामांकित दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर, आणि निर्माते मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांचा लहानपणापासून ते मोठे होण्यापर्यंत, आणि फिल्मी दुनियेत नाव कमवण्यापर्यतचा प्रवास पाहून असा विश्वास बसत आहे की, ‘अगर किसी चीज को शिद्दतसे पाने की कोशिश करो तो, वो आपको जरूर मिलती हैं.’ स्वत:वर विश्वास असल्यावर वाटेत कितीही अडचणी आल्या, तरी त्याला सामोरे जाता येते, हे मधुर भांडारकर यांच्या परिश्रमाकडे पाहून सिद्ध होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ‘चांदनी बार’, ‘सत्ता’, ‘पेज 3’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘फॅशन’ यांसारखे खूप चांगले चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीला दिले आहेत. जर त्यांच्या आयुष्यावरही चित्रपट बनला असता, तर तोही एवढाच चांगला गाजला असता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhur Bhandarkar (@imbhandarkar)

मधुर भांडारकर यांचा जन्म  26 ऑगस्ट, 1968 मध्ये झाला होता. त्याचे आयुष्य खूपच संघर्षमय आणि कठीण होते. त्यांचे वडील विद्युत क्षेत्रातील ठेकेदार होते. जेव्हा मधुर 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांना व्यवसायामध्ये नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. पैसे नसल्यमुळे मधुर यांना आपले शिक्षण सोडून द्यावे लागले होते आणि घर चालवण्यासाठी वडिलांना मदत करावी लागली होती. मधुर यांनी व्हिडिओ कॅसेट पार्लरवर काम केले होते. यासोबतच डान्स बारमधील मुलींना कॅसेट पोहोचवत असत आणि चित्रपटातील व्यक्तींनाही कॅसेट देत असत. हे करूनही ट्रॅफिक सिग्नलवर चॉकलेट-चिंगम विकत होते. एवढी खराब परिस्थिती होती की, कधीकधी उपाशीच झोपावे लागत होते. तरीही त्यांनी हिम्मत नाही सोडली आणि समाजाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहून त्यातील खरी परिस्थिती काय आहे, हे आपल्या चित्रपटातून समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला.

लहान वयातच मोठे अनुभव
परिस्थिती माणसाचे वय बघत नाही आणि तीच परिस्थिती माणसाला घडवत असते. त्याचप्रकारे मधुर भांडारकर यांनाही त्यांच्या जीवनातील संघर्षाने आयुष्याला जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि किशोरवयातच ‘चांदनी बार’सारखा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली. सामाजिक मुद्द्यावर मधुर यांनी असे काही चित्रपट बनवले आहेत, ज्याची आजही प्रशंसा केली जाते. मधुर यांनी लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, “मी खूप कमी वयात कमवायला शिकलो होतो, सायकलवरून कॅसेट पोहोचवत होतो. मला मुलांना फक्त एकच बोलायचे आहे की, स्वत:वर विश्वास करणे कधीच बंद करू नका.”

‘रंगीला’ चित्रपटात झळकले आणि ‘चांदनी बार’सारखा भन्नाट चित्रपट बनवला
मधुर यांना चित्रपट बनवण्याची आवड निर्माण झाली होती. त्यासाठी त्यांनी सहाय्यक म्हणून राम गोपाल वर्मा यांच्यासोबत  काम करण्यास सुरुवात केली, काम करत असताना चित्रपट कसा बनवतात आणि बारी बारीक गोष्टी ते शिकत होते. 1995 मध्ये त्यांनी ‘रंगीला’ चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्याच्या काही वर्षानंतर मधुर यांनी ‘त्रिशक्ती’ हा चित्रपट बनवला होता, पण या चित्रपटाला यश गाठता आले नाही. तरीही मधुर यांनी हिम्मत सोडली नाही. दोन वर्षांनी 2001 मध्ये ‘चांदनी बार’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटाने मधुर यांना बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांच्या रांगेत उभे केले होते. त्यांच्या ‘चांदनी बार’ या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले होते. हा चित्रपट एवढा गाजला. कारण, त्यांनी डान्स बार वाल्यांचे आयुष्य खूप जवळून पाहिले होते आणि हेच समजून घेऊन पडद्यावर उतरवले होते.

मधुर यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला
मधुर भांडारकर यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला होता. हे त्यांच्यासाठी केलेल्या कष्टाचे फळ होते. याव्यतिरिक्त प्रसार भारतीय मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या एनएफआयने मधुर यांच्या चित्रपटाला वास्तविक असल्याचे घोषित केले होते.

आता आरामात राहतायेत मधुर भांडारकर
‘चांदनी बार’ या चित्रपटाने मधुर यांची नय्याच पार केली होती. यानंतर त्यांनी कधीच माघार घेतली नाही. मधुर यांनी 15 डिसेंबर, 2003 मध्ये प्रेमिका रेणु नंबूदरी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना एक मुलगी आहे. आता ते खूप चांगले आयुष्य जगत आहेत. त्यांचे चित्रपट खूप गाजले आणि बक्कळ कमाई केली. आता त्यांच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी याची कमतरता नाही. मधुर यांचा ‘बबली बांउसर’ हा चित्रपट 23 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
भाईजानला बॉलिवूडमध्ये ३४ वर्ष पुर्ण, खास व्हिडिओ शेअर करत केली ‘ही’ मोठी घोषणा
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी विजयने पाच पटींनी वाढवलं मानधन, अनन्या पांडे तर जवळपासही नाही
रणबीरच्या ‘त्या’ छोट्याशा कृतीने जिंकली चाहत्यांची मने, सर्वांसमोर धरले दाक्षिणात्य दिग्गजाचे पाय

हे देखील वाचा