हिंदी सृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेते पंकज कपूर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठक ही जोडी प्रभावी अभिनयाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. इंजीनियर असलेल्या पंकज कपूर यांनी अभिनयाच्या पॅशनने पछाडत दिल्ली स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आणि त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले. तर सुप्रिया मागील 40 वर्षांपासून हिंदी आणि गुजराती चित्रपटसृष्टी गाजवत आहे. सुप्रिया यांनी टीव्हीवर देखील अनेक मालिकांमधून त्यांचा प्रभावी अभिनय जगासमोर आणला आहे. शनिवारी (07 जानेवारी) त्या आपला 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या रंजक लव्हस्टोरीबद्दल…
पंकज आणि सुप्रिया म्हणजे पंजाबी आणि गुजराती यांचे मिश्रण आहे. या दोघांची लव्हस्टोरी देखील खूपच रंजक आहे. पंकज आणि सुप्रिया या दोघांचेही पहिले लग्न तुटले होते. एकाच नावाचे सवारी असणाऱ्या या दोघांचे मने जुळली आणि त्यांनी लग्न केले.
सुप्रिया यांनी अभिनय करत असताना वयाच्या 22 व्या वर्षी उत्साहात त्यांच्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या केवळ 8 दिवसांनी त्यांना त्यांचा निर्णय चुकीचा वाटू लागला. जेमतेम वर्षभर त्या या नात्यात राहिल्या आणि नंतर त्यांनी घटस्फोट घेतला. मग त्यांनी त्यांच्या अभिनय करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित केले.
तर इकडे पंकज यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेत असतानाच नीलिमा आझमी यांच्यासोबत भेट झाली. नीलिमा यांना प्रसिद्ध डान्सर बनायचे होते आणि त्यासाठी त्या बिरजू महाराज यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेत होत्या. पंकज आणि नीलिमा यांची ओळख होताच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अफेअर सुरू झाल्यानंतर केवळ एकाच वर्षांत म्हणजेच 1975 साली त्यांनी लग्न केले. त्यावेळी पंकज 21 तर नीलिमा 16 वर्षांच्या होत्या. लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांना पहिला मुलगा शाहिद झाला. मात्र, त्याच्या जन्मानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले आणि शाहिद केवळ तीन वर्षांचा असताना त्यांनी घटस्फोट घेतला.
पंकज यांनी देखील त्यांच्या अभिनयावर लक्ष केंद्रित केले. त्याच दरम्यान पंकज आणि सुप्रिया ‘नया मौसम’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सोबत आले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुप्रिया पाठक आणि त्यांची ओळख झाली. त्या दोघांची काहीच दिवसांत चांगली मैत्री झाली. काही काळाने हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
पंकज यांच्या घरचे लगेच तयार झाले. मात्र, सुप्रिया यांच्या घरून या लग्नाला खूप विरोध झाला. तरी त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन पंकज कपूर यांच्याशी लग्न केले. या दोघांना रुहान आणि सना ही दोन मुलं आहेत. सुप्रिया या शाहिदला देखील त्यांच्या सख्या मुलाएवढेच प्रेम देतात. 23 वर्षांपासून पंकज कपूर व सुप्रिया पाठक यांचा सुखी संसार सुरू आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
घटस्फोटापासून ते धर्म बदलण्यापर्यंत विविध कारणांवरून दीपिका कक्करला करावा लागला ट्रोलिंगचा सामना
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या बिपाशाचा मार्ग नव्हता सोपा, पैशांची बचत म्हणून करायची 10 रुपयांत जेवण