Thursday, July 18, 2024

Spruha Joshi | अभिनेत्रीचा नवा व्हिडिओ, रसिकांना ऐकवली ‘एका कुमाराची कहाणी!’

मराठी सिनेसृष्टीत अनेक प्रतिभावान अभिनेत्री आहेत. अशा अभिनेत्रींमध्ये स्पृहा जोशीचे (Spruha Joshi) नाव आघाडीवर येते. तिने अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारून हे स्थान मिळवले आहे. एक उत्तम अभिनेत्री, कवियत्री, लेखिका, सूत्रसंचालक अशा अनेक भूमिका अतिशय चोखपणे साकारणाऱ्या स्पृहा जोशीने नेहमीच तिच्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या स्पृहा तिच्या यूट्यूब चॅनेलवरील तिच्या नवनवीन व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत असते.

स्पृहाने सध्या तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या चॅनेलद्वारे ती सतत तिच्या चाहत्यांना वेगवेगळ्या कथा, कविता ऐकवून त्यांचे मनोरंजन करताना दिसते. स्पृहा या चॅनेलवर बऱ्याचदा वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकवत असते, ज्या तिच्या चाहत्यांकडून बऱ्याच पसंत केल्या जातात. अशातच स्पृहाने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या चर्चेत आहे.

हा व्हिडिओ अभिनेत्रीने ८ एप्रिल रोजी पोस्ट केला आहे, ज्याचे निमित्तही तितकेच खास आहे. ८ एप्रिल रोजी थोर गायक कुमार गंधर्व यांची जयंती असते. तर या खास व्हिडिओमधून स्पृहाने त्यांना आपल्या अंदाजात श्रद्धांजली वाहिली आहे. यात तिने कविवर्य वसंत बापट यांनी कुमार गंधर्व यांच्यावर लिहिलेली कविता ऐकवली. यात तुम्ही पाहू शकता की, प्रथम ती कुमार गंधर्व यांच्याबद्दल माहिती देते. त्यानंतर ती कविता ऐकवते ज्याचं नाव आहे, ‘एका कुमाराची कहाणी.’

स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा