Monday, July 15, 2024

स्पृहा जोशीने तिच्या नवीन व्हिडिओतून ऐकवली ‘मी फूल तृणातील इवले’ ही नात्यावर आधारित कविता

उत्तम अभिनेत्री, उत्तम कवियत्री लेखिका, उत्तम सूत्रसंचालक आदी अनेक भूमिका सक्षमपणे साकारणाऱ्या स्पृहा जोशीने नेहमीच तिच्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्पृहा नेहमीच तिच्या कामातून वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. सध्या स्पृहा तिच्या यूट्यूब चॅनेलवरील तिच्या नवनवीन व्हिडिओमुळे चांगलीच चर्चेत येऊन गाजताना दिसत आहे. स्पृहाने सध्या तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या चॅनेलच्या मार्फत ती सतत तिच्या फॅन्सच्या वेगवेगळ्या फर्माईशी पूर्ण करत त्यांचे मनोरंजन करताना दिसते. स्पृहा या चॅनेलवर बऱ्याचदा वेगवेगळ्या कवींच्या कविता ऐकवत असते. स्पृहाने पोस्ट केलेल्या तिच्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तिने मंगेश पाडगांवकर यांची ‘मी फूल तृणातील इवले’ ही कविता ऐकवली आहे.

मी फूल तृणातील इवले-

मी फूल तृणातील इवले
जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणांच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशा जरी दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

– मंगेश पाडगावकर

मंगेश पाडगांवकर यांनी लिहिलेली ही अतिशय साधी सोपी नात्यावर आधारित असलेली कविता स्पृहाला सुद्धा खूप आवडते. दोन व्यक्तींमधील नाते फुलवण्यासाठी एकमेकांना हवे तसे फुलू देतात तेव्हाच त्यांचे नाते यशस्वी होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस होत चाललीये नुसरत भरुचा

फोटोमधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठी मनोरंजन मिरवतीये अभिनयाचा डंका

इटलीच्या अडल्टस्टारची प्रियकराने शरीराचे तुकडे करून केली निर्घृण हत्या, घटनाक्रम ऐकूण उडेल थरकाप

हे देखील वाचा