Sunday, February 23, 2025
Home मराठी Spruha Joshi | ‘ही वाट एकटीची, भारतीय ज्ञानाचा खजिना’, जागतिक पुस्तक दिनानिमित्त स्पृहाचा खास Video

Spruha Joshi | ‘ही वाट एकटीची, भारतीय ज्ञानाचा खजिना’, जागतिक पुस्तक दिनानिमित्त स्पृहाचा खास Video

स्पृहा जोशी सध्या चित्रपट मालिकांपेक्षा जास्त तिच्या यूट्यूब व्हिडिओमुळे गाजताना दिसत आहे. आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा आगळावेगळा आणि सुंदर मार्ग तिने शोधून काढला आहे. या यूट्यूब चॅनेलवरून स्पृहा सतत वेगवेगळे सुरेख व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कधी फॅन्सच्या फर्माइशीवरून कवितांचे वाचन, कधी विशिष्ट दिनाच्या निमित्ताने खास कार्यक्रम यामुळे स्पृहा खूपच लोकप्रिय होत आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवरून स्पृहा जोशी नेहमीच महिन्यातून एकदा एक ‘माय बुकशेल्फ’ या सेगमेंटमध्ये ती तिच्या वाचनात आलेल्या नवनवीन पुस्तकांबद्दल माहिती देताना दिसते. या महिन्याच्या या सेगमेंटमध्ये अतिशय दुग्ध शर्करा योग स्पृहाने साधला आहे. २२ एप्रिल जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने स्पृहाच्या वाचनात आलेल्या पुस्तकांबद्दल सांगितले. या यूट्यूब चॅनेलच्या भागात स्पृहाने व.पु. काळे यांच्या ‘ही वाट एकटीची’ आणि प्रशांत पोळ यांच्या ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ या दोन पुस्तकांवर भाष्य केले आहे.

व. पु. काळे यांची ‘ही वाट एकटीची’ ही पहिली कादंबरी. १९६८ साली एखाद्या लेखकाला एका नायिकांबद्दल लिहावेसे वाटले. ज्यातमध्ये ती बाई एका अफेयरमधून एका मुलाला जन्म देते आणि तिला नंतर समजते की ते मूलही तिचे नाही आणि तिला तिचा एकटीनेच प्रवास करायचा आहे. यावर ही कादंबरी आहे. मात्र आजच्या काळात ही कादंबरी कालबाह्य आहे असे वाटू शकते.

स्पृहाने वाचलेला दुसरे पुस्तक म्हणजे प्रशांत पोळ यांचे ‘भारतीय ज्ञानाचा खजिना.’ या पुस्तकामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत आल्या नाही, काही गोष्टी सध्या प्रचलित नाही, आपल्या पूर्वजांनी अनेक मोठे आकर्षक शोध लावले, आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणावर ज्ञान होते यावर हे पुस्तक भाष्य करते. स्पृहाच्या या सेगमेंटमुळे लोकांना विविध पुस्तकांबद्दल माहिती तर मिळतेच शिवाय त्यांच्यात वाचनाबद्दल एक जिज्ञासा देखील निर्माण होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा