Wednesday, March 12, 2025
Home मराठी तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

तपकिरी रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य, पाहायला मिळाला अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री स्पृहा जोशी चित्रपटसृष्टीतल्या प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. याठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा ती तिच्या लिखाणामुळे चर्चेत येत असते. मात्र आता अभिनेत्री तिच्या एका दिलखेचक फोटोमुळे चर्चेचा विषय बनली आहे.

स्पृहा जोशीने तिच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्पृहाचे कमाल सौंदर्य पाहायला मिळत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, तिने मरून रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात तिचं रूप आणखीनच खुललेलं दिसत आहे. या लूकला पूर्ण करत तिने ड्रेसवर मॅचिंग नेकलेस आणि अंगठी घातली आहे. तसेच यावर सुंदर हेअरस्टाईल करून अभिनेत्री हा फोटो चाहत्यांसमोर सादर केला आहे.

हा फोटो शेअर करत स्पृहाने कॅप्शनमध्ये सूर्याचं ईमोजी बनवलं आहे. आता तिचा हा फोटो चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. चाहते फोटोखाली कमेंट्स करून कौतुकाचे पूल बांधत आहेत. शिवाय चाहते भरभरून लाईक्सही देत आहेत. काही तासातच या फोटोवर ११ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

अभिनयासोबत स्पृहाला कविता लिहण्याची देखील आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते. स्पृहा तिच्या कवितेमुळे अनेकदा चर्चेत येत असते. स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अभिनेत्रीने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ या रियॅलिटी शोमध्ये स्पृहा होस्ट म्हणून कार्यरत आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिर से’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा