Thursday, June 26, 2025
Home मराठी ‘निसर्गाचेही मूड्स असतात’, पहिल्या पावसाची स्पृहा जोशीची कविता व्हायरल

‘निसर्गाचेही मूड्स असतात’, पहिल्या पावसाची स्पृहा जोशीची कविता व्हायरल

अभिनेत्री स्पृहा जोशी (spruha joshi)तिच्या अभिनयामुळे तर लोकप्रिय आहेच. परंतु तिच्यातील आणखी एक गन म्हणजे ती एक उत्तम कवयित्री देखील आहे. तिने तिचे स्वतःच्या कवितांचे एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. यु ट्यूबवर तिचा चॅनेल देखील आहे. त्यावर ती तिच्या वेगवेगळ्या कविता सादर करत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिच्या कविता मोठ्या प्रमाणात आवडतात. अशातच पावसाळा सुरु झाला आहे. अनेक कवींना या काळात कविता सुचतात. मुळात सगळे वातावरणच सुंदर होऊन जाते. अशावेळी स्पृहाने पहिल्या पावसाची तिची एक कविता सादर केली आहे. तिची ही कविता सगळ्यांना खूप आवडली आहे.

स्पृहाच्या कवितेचे नाव पहिला पाऊस असेच आहे. अत्यंत सुंदर प्रकारे तिने या कवितेचे सादरीकरण केले आहे. तिच्या कवितेच्या ओळी आहेत, निसर्गानेही मूड्स असतात. दुपारपर्यंत सारखं मथळ येत होतं… जात होतं. त्याचा घास दाटून येत होता वाटायंच… आता कोणत्याही क्षणी रडूच फुटेल त्याला… आता मात्र लहान बाळासारखा हसतोय नाटकी… मला तेव्हाच अंदाज यायला हवा होता. आज पहिला पाऊस येणार आहे म्हणून… माझा अंगणात आज पहिला पाऊस आला.”

तिच्या कवितेचे बोल सगळ्यांना खूप आवडले आहेत. तिचे अनेक चाहते यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

प्रार्थना बेहेरेच्या घरी नव्या पाहुण्याची एन्ट्री! गोंडस व्हिडिओ शेअर करत नावही सांगितलंय

ब्रालेस क्रॉप टॉपने चर्चेत आला दिशा पटानीचा व्हिडिओ, एकदा पाहाच

व्हिडिओ: अभिनेता अंकितच्या ७ महिन्याच्या चिमुकल्याकडून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, तुम्हीही कराल कौतुक

हे देखील वाचा