Wednesday, July 3, 2024

Valentine Special | खास दिनी स्पृहा जोशीचा व्हिडिओ, सादर केल्या मनाला भिडणाऱ्या कविता!

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) चित्रपटसृष्टीतली एक प्रतिभावान कलाकार आहे. तिने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी करत, रसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकदा कौतुकही झालंय. मात्र तिच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली, तर तुमच्या लक्षात येईल की, तिला अभिनयासोबत कविता लिहण्याची देखील प्रचंड आवड आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ही कला बऱ्याचदा चाहत्यांसमोर सादर करताना दिसते.

अभिनेत्रीने तिचे एक यूट्यूब चॅनल सुरु केले आहे, ज्याच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन तर करतेच, सोबतच त्यांना अनेक गोष्टींसाठी प्रोत्साहित करते, जागरूक करते. ती तिच्या चॅनेलवर कविता वाचन, आवडलेल्या पुस्तकाबद्दल माहिती आदी अनेक गोष्टी करते. स्पृहाच्या या सर्व व्हिडिओंना चांगलाच प्रतिसाद देखील मिळतो.

अशातच सोमवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यात आला. हे खास निमित्त साधत स्पृहाने एक खास व्हिडिओ तिच्या यू ट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. जो चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये स्पृहाने तिच्या आवडीची कविता चाहत्यांसमोर सादर केली आहे. कवी सुधीर मोघे यांची कविता सादर करताना स्पृहा म्हणते की…
“दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित सोनेरी ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्याही आयुष्यात प्रेम येतं।
शोधून कधी सापडत नाही, मागून कधी मिळत नाही
वादळ वेड घुसत तेव्हा टाळू म्हणून तळत नाही,
आकाश पाणी वारे तारे सारे एक होतात, वर्षांच्या विटलेल्या बधिर मनाला आवेगांन्चे तुरे फुटतात,
संभ्रम, तळमळ, सांत्वन किती किती तत्र्हा असतात, सारख्या सारख्या जीव घेण्या पण खोल जिव्हारी ठसतात।
प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं, इथल्या जयपराजया देखील एकच गहीर सार्थक असतं।
सुधिर मोघे शेवटी म्हणतात,
मात्र ते भोगन्यासाठी एक उसळणारं मन लागतं, खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागत
खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं…”

पुढे स्पृहा स्वत: लिहीलेल्या दोन कविता ऐकवते. ती म्हणते,
“आपण मिठी मारली, एक झालो, एकच धुराळा उडाला,
आपण मिठी मारली, एक झालो, एकच धुराळा उडाला,
वादळ शांत झालं, वावरभर वाळूचा एकच थर,
वावरभर वाळूचा एकच थर, वाळूभर एकच नाव मी कोरत राहीले,
वाळूभर एकच नाव मी कोरत राहिले, पुन्हा पुन्हा नवं वादळ अंगावरती घेत राहिले,
पुन्हा पुन्हा नवं वादळ अंगावरती घेत राहिले।”

“हे सगळं नेमकं कधी घडलं,
हे सगळं नेमकं कधी घडलं,
त्या रात्री जेव्हा हातात हात घट्ट धरुन जगाकडे पाठ करुन आकाश बघत निजलो होतो,
त्या रात्री जेव्हा हातात हात घट्ट धरुन जगाकडे पाठ करुन आकाश बघत निजलो होतो,
एकमेकांच्या डोळ्यांनी आकाश गंगा प्यायलो होतो,
हे सगळं नेमकं तेव्हा घडलं, हे सगळं नेमकं तेव्हा घडलं।”

शेवटी वैभव जोशी यांची प्रपोजची कविता ऐकवताना स्पृहा म्हणते,
“एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको,
फार काही नको फक्त नाही नको,
एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको।
एकदा दोनदा ठिक आहे सखे, एकदा दोनदा ठिक आहे सखे,
पण तुझे लाजने बारमाही नको, थेट स्पर्शातुनही बोल काही तरी।
थेट स्पर्शातूनही बोल काही तरी, गुढ शब्दातली मौन ग्वाही नको,

गुढ शब्दातली मौन ग्वाही नको…”

“आपले भेटणे हीच कोजागिरी,
आपले भेटणे हीच कोजागिरी,
चांदनेही नको चांदवाही नको,
एक होकार दे फार काही नको,
फार काही नको फक्त नाही नको…”

स्पृहाने ‘मोरया’, ‘पैसा पैसा’ अशा चित्रपटात अभिनय करून बरीच प्रसिद्धी मिळवली. तिने २००४ साली आलेल्या ‘माय बाप’ मधून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अभिनेत्रीने बऱ्याच नाटकातही काम केले आहे. शिवाय तिने अलीकडेच ‘रंगबाझ फिरसे’ द्वारे ओटीटीवर देखील पदार्पण केले आहे.

हेही वाचा

हेही पाहा-

हे देखील वाचा