दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने आपल्या अभिनयाने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. श्रीदेवीपाठोपाठ तिची मुलगी जान्हवी कपूरनेही आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा बनवली आहे. अभिनयाव्यतिरिक्त जान्हवी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा आपले नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
जान्हवीने हे फोटो तिने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो गार्डनमधील आहेत. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि रंगीबेरंगी पॅन्ट घातली आहेत. फोटोमध्ये ती रंगीत फूल ड्रेस घालून पार्कमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसेच तिने तिचा लूक केसांमध्ये एक फुल लावून पूर्ण केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये स्वतःला ‘फ्लॉवर चाईल्ड’ म्हणून वर्णन केले आहे.
जान्हवीच्या या फोटोंना आतापर्यंत ८ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच ४ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर जान्हवी कपूर लवकरच आनंद एल रायच्या ‘गुड लक जेरी’ यामध्ये दिसणार आहे. तिने या चित्रपटाचे शूटिंग देखील पूर्ण केले आहे. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा ‘दोस्ताना २’ आणि ‘तख्त’ हे पिरियड ड्रामा आहे. ज्यात ती रणवीर सिंग, करीना कपूर, विकी कौशल, अनिल कपूर यांच्यासोबत काम करणार आहे.
यासोबतच जान्हवीने साल २०२० मध्ये ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटात काम केले होते. यानंतर ती यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये ‘रूही’ चित्रपटातही झळकली आहे. यासह एक ‘बॉम्बे गर्ल’ हा चित्रपट देखील येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’
-एनसीबी शाहरुख खानला लक्ष्य करतेय? लावलेल्या आरोपांवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी तोडले मौन










