बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या खूप चर्चेत आहे. कारण आहे तिचा आगामी चित्रपट ‘गुड लक जेरी’. या चित्रपटातील जान्हवीची व्यक्तिरेखा, हिंदी चित्रपटांमध्ये क्वचितच दाखवली जाते. या चित्रपटात जान्हवी तिच्या घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. ‘गुड लक जेरी’ थेट ओटीटीवर येणार आहे. जान्हवीही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच ही अभिनेत्री करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ या शोमध्येही दिसली होती.
जान्हवी कपूर तिची आई श्रीदेवीच्या (Sridevi) खूप जवळ होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीलाच धक्का बसला नाही, तर श्रीदेवीचे संपूर्ण कुटुंबही हादरले. जान्हवीलाही यातून सावरायला खूप वेळ लागला. आजही तिला नेहमी आईची आठवण येते. अलीकडेच, अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान तिच्या आईशी संबंधित एक गोष्ट शेअर केली आहे. (sridevi used to visit tirupati every birthday)
नुकतेच एका मुलाखतीदरम्यान तिला विचारण्यात आले की, ती तिच्या नशिबासाठी कोणतेही धार्मिक कार्य करते का? तर याला उत्तर देताना तिने सांगितले की, ती तिच्या प्रत्येक चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन तिरुपतीला नक्कीच जाते. कारण तिची आई (श्रीदेवी) दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी तिरुपतीला जायच्या. पण लग्नानंतर त्यांनी तसे करणे बंद केले. आता नवीन वर्ष आणि श्रीदेवींच्या वाढदिवसाला जान्हवी नक्कीच तिरुपतीला जाते.