Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड सुपरफ्लॉप डेब्यूनंतर स्टारकिडला दुसरी संधी, ब्लॉकबस्टर हिरोसह रोमँटिक भूमिकेत; नव्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

सुपरफ्लॉप डेब्यूनंतर स्टारकिडला दुसरी संधी, ब्लॉकबस्टर हिरोसह रोमँटिक भूमिकेत; नव्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

२०२५ हे वर्ष अनेक स्टारकिड्ससाठी खास ठरले. काहींनी पडद्यामागे तर काहींनी थेट मोठ्या पडद्यावर पदार्पण करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि अनन्या पांडेचा कझिन अहान पांडे यांनी या वर्षात आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्याचबरोबर रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगनचा भाचा अमान देवगन यांनीही पदार्पण केले, मात्र त्यांचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही.

आता मात्र राशा थडानीच्या वाट्याला आणखी एक मोठा चित्रपट आला असून, तिच्या दुसऱ्या सिनेमाचा फर्स्ट पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ती २०२४ मधील सुपरहिट हॉरर थ्रिलर ‘मुंज्या’ मधून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेता अभय वर्मासोबत (Abhay Verma)झळकणार आहे.

राशा थडानी आणि अभय वर्मा मुख्य भूमिकेत असलेला चित्रपट ‘लाइकी लाइका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरवर दोघांचे रक्ताने माखलेले बूट दिसत असून, चित्रपटाची कथा प्रेम आणि हिंसेच्या संघर्षावर आधारित असल्याचे संकेत मिळतात. पोस्टर शेअर करताना राशाने “Get love!” असे कॅप्शन लिहिले आहे. चाहत्यांकडून पोस्टरवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

राशा आणि अभय यांनी अलीकडेच दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशनल सॉन्गचे शूटिंग पूर्ण केले आहे. सौरभ गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट याच वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कनॉट प्लेस, लोधी रोड आणि विजय घाट यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘लाइकी लाइका’ व्यतिरिक्त राशा थडानी तिच्या तेलुगु पदार्पणामुळेही चर्चेत आहे. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी ती सज्ज झाली असून, या प्रोजेक्टबाबत लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

नुपुर-स्टेबिनच्या रिसेप्शनला ग्लॅमरचा तडका, कृति सेननचा सौंदर्यजलवा; तर रणबीर-आलियाची ग्रँड एन्ट्री चर्चेत

हे देखील वाचा