Thursday, April 24, 2025
Home अन्य चापट मारल्यानंतर आता अनिता हसनंदानीने पतीच्या डोक्यावर ओतले पाणी; पाहा पती रोहितची प्रतिक्रिया

चापट मारल्यानंतर आता अनिता हसनंदानीने पतीच्या डोक्यावर ओतले पाणी; पाहा पती रोहितची प्रतिक्रिया

अभिनेत्री अनिता हसनंदानी सोशल मीडियावर तिच्या मजेदार पोस्टमुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अलीकडेच तिला आई बनन्याचे सुख लाभले आहे. अनिता सध्या तिचे मातृत्व अनुभवत आहे. ती नेहमी तिच्या मुलासोबतचे गोंडस फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. त्याचवेळी आजकाल अनिताची एक वेगळीच स्टाईल पाहायला मिळत आहे.

ती तिचा पती रोहित रेड्डीसोबतचे विचित्र पण मजेदार व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. पूर्वी अनिताने पतीला चापट मारल्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. आता तिने तिच्या पतीवर पाणी ओतले आहे. तसेच या प्रँकवर अनिताच्या पतीच्या प्रतिक्रिया अगदी पाहण्यासारख्या होत्या.

पतीच्या डोक्यावर टाकले पाणी
अनिता हसनंदानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या पतीसोबत टेबलाजवळ बसली आहे. सोबत ती कॅमेऱ्याकडे बघून बोलत आहे की, “मॅजिक ट्रिक गेल्यावेळी खूपच खराब होती. पण यावेळी मी सराव केला आहे आणि यावेळी हे नीट होईल.” ती एक रिकामा मग दाखवते, ज्यामध्ये ती कपाने पाणी भरते आणि शेजारी बसलेल्या तिच्या पतीच्या डोक्यावर पाणी ओतते.

प्रँकनंतर पतीची प्रतिक्रिया
या व्हिडिओमध्ये प्रँक केल्यानंतर अनिता जोरजोरात हसताना दिसली, तर दुसरीकडे, पती रोहितच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. हा मजेदार व्हिडिओ शेअर करत अनिताने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मी खूप चांगली जादूगार बनत चालली आहे.” दोघांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनिताची खोडकर वृत्ती चाहत्यांना खूप हसवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा