Saturday, June 29, 2024

‘ओ तेरी!’ अनुष्कानेे पती विराटला एकदा नव्हे, तर दोनदा उचलून दाखवली आपली ताकद, चाहत्यांनी म्हटले ‘शक्तिमान’

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हे बॉलिवूडमधील एक क्यूट जोडपे आहेत. चाहते त्यांच्यातील केमिस्ट्रीचे आणि बॉन्डिंगचे खूप कौतुक करतात. आता अनुष्काने इंस्टाग्रामवर एक गोंडस व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला उचलताना दिसत आहे. तिने विराटला एकदा नव्हे तर दोन वेळा उचलले. त्यांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून युजर्स अनुष्काचे ‘शक्तीमान’ म्हणून वर्णन करत आहेत.

अनुष्काने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये ती विराटला मागून मिठी मारते आणि नंतर उचलते. ती असे करत असताना, विराटच्या तोंडातून ‘ओ तेरी!’ असे निघते. तो म्हणतो, ‘परत कर.’ त्यावर अनुष्का म्हणते की, “तू मला मदत करू नको.” यावर तो म्हणतो, “नाही करणार प्रॉमिस.” यानंतर अनुष्का विराटला पुन्हा एकदा उचलते.

विरुष्काचा हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. कमेंट बॉक्समध्ये काहींनी अनुष्काला ‘शक्तीमान’ तर काहींनी ‘शक्तीमान अल्ट्रा प्रो मॅक्स’ म्हटले आहे. यावर विराट कोहलीने हसणारे व हार्ट ईमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला आतापर्यंत १९ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर १६ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

अनुष्काचा हा व्हिडिओ कदाचित जुना आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “मी ते खरंच केले का?” विरुष्का या वर्षी जानेवारीत पालक बनले. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म देऊन तिचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. सध्या दोघांनीही वामिकाला मीडियाच्या चकाकीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘नदियों पार’ गाण्यावर थिरकली अभिनेत्री, पाहून नोरा फतेही म्हणाली, ‘उर्वशीचा डान्स लय…’

-‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

हे देखील वाचा