Saturday, June 29, 2024

‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीच्या बाथरूममधील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष, ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा

‘बिग बॉस १४’ द्वारे घराघरात आपली ओळख निर्माण करणारी निक्की तांबोळी काही दिवसांपूर्वी कोविड पॉझिटिव्ह आली होती. महिनाभर उपचार झाल्यानंतर आता तिची कोव्हिड-१९ चाचणी निगेटिव्ह आली आहे. बरे झाल्यानंतर निक्की तांबोळी मुंबईत स्पॉट झाली. सर्वांनी मास्क लावावे असे आवाहनही तिने केले. मुंबईत स्पॉट होण्यापूर्वी निक्कीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये निक्कीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉसच्या १४’ व्या सीझनमध्ये निक्की तांबोळी तिच्या वादविवादांमुळे बरीच चर्चेत होती. शो संपल्यानंतर ती बाहेर फिरताना आणि बऱ्याच ठिकाणी पार्टी करताना दिसली. त्याच्या काही दिवसांनंतरच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली. निक्की घरात क्वारंटाईन होती आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःची काळजी घेत होती. जवळपास 19 दिवस घरी राहिल्यानंतर, निक्की विमानतळावर पाहिली गेली. तिथे तिने फोटोग्राफर्सला मास्क लावायचे आवाहनही केले आणि म्हणाली, “मी सहन केलंय, हे खूप वाईट आहे.”

घराबाहेर पडण्यापूर्वी निक्कीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात ती कॅमेर्‍यासमोर पोज देताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते फिदा झालेे आहेत. या व्हिडिओला तब्बल २ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. घरी आराम करताना निक्की अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करायची. तिने एका पोस्टमध्ये लिहिले होते की, ती शूटिंगला मिस करत आहे.

निक्की तांबोळी ‘बिग बॉस १४’ मध्ये खूपच मजबूत स्पर्धक होती, म्हणून तिला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. निक्की या शोची द्वितीय रनर-अप होण्यात यशस्वी झाली होती. निक्कीने नुकतेच आराध्या मानसोबत एक गाणे लाँच केले आहे. तिने तिच्या गाण्याचे नाव बर्थडे पावरी (Birthday Pawri) असे ठेवले. ज्याला खूप पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पारंपारिक ड्रेसमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित दिसतेय एकदम भारी! तब्बल ‘इतक्या’ किमतीत तुम्हीही घेऊ शकता विकत

-‘मॉर्डन रांझा’ गाण्यावर नेहा कक्करने लावले ठुमकेे; चाहत्यांसह पती रोहनप्रीत सिंगनेही केले कौतुक!

-जॉनी लिव्हरच्या मुलीने केला अक्षय कुमारच्या गाण्यावर जोरदार डान्स, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

हे देखील वाचा