बिग बॉस फेम अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita shetty) बुधवारी (२ फेब्रुवारी) तिचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये शानदार परफॉर्मन्स दिल्यानंतर बिग बॉस सीझन १५ चा भाग असलेली शमिता शेट्टी शेवटपर्यंत गेममध्ये राहिली. जवळपास ३ महिने बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर तिने अलीकडेच कार्यक्रमातील तिच्या अनेक सहकारी खेळाडूंसोबत वाढदिवस साजरा केला. या खास सोहळ्याला शमिताची मोठी बहीण शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि राज कुंद्राही (raj kundra) उपस्थित होते.
राज कुंद्रा फोटोग्राफर्सना दिसला टाळताना
मात्र, राज कुंद्रा फोटोग्राफर्सना टाळत शांतपणे रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसला. जेव्हा शमिता बिग बॉस ओटीटीचा भाग होती, तेव्हा तिचा मेहुणा राजला अश्लील चित्रपट प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि तिची बहीण शिल्पाला कोणताही पाठिंबा नव्हता. अलीकडेच शमिताने या संपूर्ण घटनेवर पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली आहे.
शिल्पासोबत नसल्याचे वाटले दु:ख
शमिता म्हणाली की, “त्या कठीण काळात मी शिल्पासोबत नव्हते याचे मला खूप वाईट वाटते. मला तिच्यासोबत राहून खूप आनंद झाला असता कारण मला आठवते की, मी बिग बॉस ओटीटीमध्ये असताना मला तिची खूप काळजी वाटत होती आणि ती बाहेरची परिस्थिती कशी हाताळत आहे हे मला समजत नव्हते. मला बाहेर काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते, कारण आम्ही खूप जवळ आहोत.”
शमिता म्हणाली की, “पण जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला, तेव्हा आम्ही खंबीरपणे बाहेर आलो, या संपूर्ण घटनेने तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे.” ‘बिग बॉस’मध्ये ट्रोल झाल्याबद्दल शमिता म्हणाली की, “माझा या संपूर्ण घटनेशी काहीही संबंध नव्हता, जे अत्यंत दुर्दैवी होते.”
बिग बॉसमध्ये झाली होती ट्रोल
शमिता म्हणाली की, “म्हणूनच मला शोमध्ये जावं असं वाटलं. तसेच तुम्हाला माहिती आहे की, कोव्हिडमुळे लोक घरी बसले आहेत आणि त्यांच्याकडे काम नाही, तेव्हा मला या संधीचा अपमान करून पैसे गमवायचे नव्हते. त्यामुळेच मी बिग बॉसच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाही बाहेर खूप चर्चा सुरू होत्या.”
राकेश बापट यांनी शमिता शेट्टीचा ४३वा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शमिता शेट्टीच्या बर्थडे पार्टीचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा :