Friday, July 5, 2024

Bigg Boss OTT: राकेशने दिव्याला मिठी मारताच शमिता झाली ‘जेलस’; रागाच्या भरात म्हणाली, ‘तुझी गर्लफ्रेंड…’

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये, बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट या दिवसांत त्यांच्या खास कनेक्शनने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. दोघांच्या घट्ट होत असलेल्या मैत्रीच्या दरम्यान, प्रेक्षक त्यांच्यातील रुसवे- फुगवे आणि छोट्या- मोठ्या भांडणाचा खूप आनंद घेत आहेत. आता शोमध्ये राकेश बापटने त्याच्या सर्व वैयक्तिक गोष्टी शमितासोबत शेअर करायला सुरुवात केली आहे. त्याचवेळी राकेशला दुसऱ्या कोणासोबत पाहून शमिताला थोडी जेलसी वाटू लागली आहे. याची झलक तुम्हाला शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये स्पष्टपणे पाहता येईल.

दिव्यासोबत राकेशला पाहून शमिता झाली अस्वस्थ
वूटच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘बिग बॉस ओटीटी’चा लेटेस्ट प्रोमो शेअर करण्यात आला आहे. प्रोमोची सुरुवात दिव्या अग्रवाल आणि राकेश बापट यांच्यापासून होते. जेव्हा झीशान खान शो मधून बाहेर पडला, तेव्हा दिव्या रडत होती. त्यावेळी राकेश बापट तिला गप्प करतो आणि मिठी मारतो. शमिता स्वयंपाकघरातून हे सर्व पाहत असते. यावर दिव्या राकेशला म्हणते, “तू इथून जा प्लीज. नाहीतर शमिता म्हणेल की मी तुझ्यावर लाइन मारत आहे.” (story bigg boss ott shamita shetty says to rakesh bapat i am not your girlfriend)

‘मी तुझी गर्लफ्रेंड नाहीये’
दिव्याने असे म्हणताच राकेश तिथून उठतो आणि शमिताकडे येतो. पण शमिता रागाच्या भरात त्याच्याशी काहीच बोलू इच्छित नाही. शमिता राकेशकडे दुर्लक्ष करते आणि राकेश म्हणतो की तिने (दिव्या) स्वतःला मजबूत बनवावे अशी माझी इच्छा आहे. हे ऐकून शमिता म्हणते, “तू मला स्पष्टीकरण का देत आहेस, मी तुझी गर्लफ्रेंड नाहीये. मी तिच्यावर किंवा कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही.”

 

‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी लिहिले खास कॅप्शन
शमिता-राकेशचा हा व्हिडिओ शेअर करत ‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी कॅप्शन दिले आहे की, “ये लडका है दीवाना, है दीवाना दीवाना…जर तुम्हाला हे दोघे क्यूट वाटले तर हार्ट ड्रॉप करा.” तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

-केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

 

हे देखील वाचा