Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड ‘इंदिरा नगर की गुंडी हूं मैं’, म्हणत दीपिका पदुकोणने शेअर केला लहानपणीचा क्यूट फोटो, छोट्या दीपिकालाही मिळतेय चाहत्यांची पसंती

‘इंदिरा नगर की गुंडी हूं मैं’, म्हणत दीपिका पदुकोणने शेअर केला लहानपणीचा क्यूट फोटो, छोट्या दीपिकालाही मिळतेय चाहत्यांची पसंती

बॉलिवूडची सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दीपिका अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. दरम्यान, दीपिकाने तिचा एक लहानपणीचा एक जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

खरं तर दीपिकाने, छोट्या दीपिकाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो दीपिकाच्या बालपणीचा आहे, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. हा हिवाळ्यातील फोटो असल्याचे दीपिकाच्या कपड्यांवरून स्पष्ट दिसून येत आहे. डोक्यावर टोपी घातलेल्या दीपिकाला पाहून, चाहत्यांना भुरळ पडत आहे आणि ते या थ्रोबॅक फोटोचे खूप कौतुकही करत आहेत.

तसेच, चाहत्यांना फक्त हा फोटोच नाही, तर फोटोचे कॅप्शनही खूप आवडले आहे. दीपिकाने थ्रोबॅक फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, “इंदिरा नगर की गुंडी हूं मैं.” कॅप्शनसोबतच दीपिकाने हसणारा इमोजी वापरला असून, फोटो तिच्या आईने क्लिक केल्याचेही सांगितले आहे.

खरं तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो ‘इंदिरा नगर की गुंडा हूं’ असे म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर दीपिकानेही तिचा फोटो शेअर करत असे म्हटल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगलीय.

दीपिका पदुकोणच्या चित्रपट प्रकल्पांबद्दल बोलायचे झाले, तर ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच दीपिका ‘फायटर’ चित्रपटात हृतिक रोशनसोबतही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. या सर्व चित्रपटांबरोबरच दीपिका पती रणवीर सिंगसमवेत ’83’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दीपिकाने सन २००७ साली ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खानही मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने तब्बल २०० कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझ्याकडे ब्राची जोडी आहे, पत्ता सांगा…’, अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोवर युजरची विचित्र कमेंट, तिनेही ‘अशी’ केली बोलती बंद

-‘तू श्रीदेवीचे नाव खराब करत आहे’, जान्हवी कपूरने हॉट फोट शेअर करताच नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

-लाखात एक भेट! पती डॅनियलकडून लग्नाच्या १० व्या वाढदिवशी सनी लिओनीला खास गिफ्ट, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

हे देखील वाचा