Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड सावत्र मुलीसोबतही आहे दिया मिर्झाचे चांगले नाते! फोटो शेअर करत प्रेम केले व्यक्त

सावत्र मुलीसोबतही आहे दिया मिर्झाचे चांगले नाते! फोटो शेअर करत प्रेम केले व्यक्त

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जबरदस्त चर्चेत आहे. वैभव रेखीशी लग्न झाल्यानंतर, आता दिया तिच्या हनीमूनसाठी गेली आहे. यादरम्यान, ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय राहते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हनिमूनचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. त्याचबरोबर, या फोटोंमधील खास गोष्ट म्हणजे, दिया आपल्या पतीसोबत नाही, तर वैभवच्या मुलीसोबत मस्ती करताना दिसली आहे.

दियाने तिच्या हनीमूनच्या सुट्टीतील हे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मालदीवमध्ये शानदार सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. समोर आलेल्या या फोटोंमध्ये दियाचा पती दिसला नाही, परंतु ती मुलगी समायरासोबत बीचवर पोज देताना, तर कधी पाण्यात मस्ती करताना दिसली. हे फोटो पाहून असे दिसते की, दियाचे समायरावर खूप प्रेम आहे. तसेच वैभवनेच हे सुंदर फोटो काढले असतील, असे समजते.

या फोटोंकडे पाहून हे सहज लक्षात येते की, दिया आणि तिची सावत्र मुलगी समायराचे खूप चांगले नाते आहे. एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर दोघीही खूप आनंदी दिसत आहेत. दियाच्या सुट्टीचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी तर वैभवचे फोटो पाहण्याची मागणी देखील केली आहे.

दिया आणि वैभवने गेल्या महिन्यात अगदी साधेपणाने लग्न केले आहे. यानंतर नवविवाहित जोडपे मुलगी समायरासोबत फिरायला गेले आहेत. वैभवची माजी पत्नी आणि योग शिक्षिका सुनैनानेही दिया आणि वैभवच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली होती. या लग्नाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, दियाचे लग्न एका महिला पंडितने लावले होते. ही बाब त्यावेळी चर्चेचा विषय बनली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा