Friday, July 5, 2024

‘अक्कल विकून आंबे घेत आहेस का?’ तोंडाचा मास्क काढून आंब्याचा वास घेणारी फराह खान नेटकऱ्यांकडून ट्रोल

कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माता फराह खानचा एक व्हिडिओ या दिवसात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फराह रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या गाड्यावरून आंबे खरेदी करताना दिसत आहे. आंबे खरेदी करताना तिने असे काही केले की, ते पाहून सोशल मीडिया युजर्स खूपच संतापले. तथापि, या वेळी लोकांची नाराजीही चुकीची नव्हती.

या व्हिडिओमध्ये फराह खानने राखाडी रंगाचा टीशर्ट घातला आहे. ती विक्रेत्याला चांगला आंबा दाखवायला सांगते आणि स्वत: ही आंबे बघत आहे. त्यादरम्यान, फराह आपला मास्क काढून आंब्याचा वास घेताना दिसली. कोरोनाच्या काळात, फराहने असे करणे लोकांना आवडले नाही आणि त्यांनी तिचे ‘अस्वच्छ’ असे वर्णन केले.

या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आता कमेंट्सचा पाऊस पडत आहे. युजर्स फराहला वाईट रीतीने ट्रोल करताना दिसले. एक युजर म्हणाला, “कोविडच्या काळात मास्क काढून आंब्याचा वास कोण घेतं? तेही महाराष्ट्रात.”

दुसरा युजर म्हणाला, अरे भाऊ, मार मला मार.” आणखी एक युजर म्हणाला, “अक्कल विकून आंबे घेत आहेस का?”

एका युजरने तर लिहले, “वेंडरने हातात आंबा घेतला, फराहनेही हातात आंबा घेऊन त्याचा वास घेतला, नाकावर स्पर्श केला. तिने बरेच आंबे उचलले आणि त्यांचा वासही घेतला. व्हायरस कसा पसरतो हे खरोखरच लोकांना माहित आहे का?” या व्हिडिओवरून फराह खानला जबरदस्त ट्रोल केले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा