Wednesday, July 3, 2024

ब्रेकिंग! बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याला विमानतळावरच अटक

सेल्फ क्लेम समालोचक कमाल रशीद खान (KRK) याला पोलिसांनी अटक केली आहे. कमाल रशीद खान विरोधात मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटसाठी पोलिसांनी कमाल रशीद खानवर कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

त्याला आजच बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. कमाल रशीद खान हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. केआरके दररोज कोणत्या ना कोणत्या चित्रपटाबद्दल किंवा सेलिब्रिटीबद्दल चुकीची माहिती देतो, त्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल देखील केले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कॉलेजच्या रॅगिंगने बदलले चित्रांगदा सिंगचे आयुष्य, ‘अशी’ मिळाली पहिली ऑफर

पार्टी आणि स्टेज शो करून गुरु रंधावाने केली गायनाला सुरुवात, ‘या’ गाण्याने रातोरात केले फेमस

हे देखील वाचा