Wednesday, July 3, 2024

‘पंगा क्वीन’ कंगना रणौतने तापसी पन्नूवर केलेल्या कमेंटवर भडकले चाहते, म्हणाले…

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती देश आणि इंडस्ट्रीशी संबंधित जवळपास प्रत्येक विषयावर आपले मत व्यक्त करताना दिसली आहे. अलीकडेच, कंगना एका पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री तापसी पन्नूबद्दल अशी कमेंट करताना दिसली होती, जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले.

खरं तर, कंगनाने तापसीला ‘शी-मॅन’ म्हटले आहे. तापसीच्या बऱ्याच चाहत्यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासोबत कंगनाच्या अनेक फॉलोवर्सनेही यावर आक्षेप घेतला. आता या कमेंटनंतर कंगनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट रिट्वीट केली असून त्यात तापसीबद्दल बर्‍याच अपमानकारक गोष्टी लिहिल्या गेलेल्या पाहायला मिळाल्या. यात कंगनाने तापसीवर केलेल्या यापूर्वीच्या कमेंट्सबद्दलही बोलण्यात आले आहे. ही पोस्ट रिट्विट करत कंगनाने लिहिले, “हा हा, शी-मॅन आज खूप आनंद होईल.” त्याचवेळी कंगनाच्या या उत्तरावर तापसीचे अनेक चाहते संतापले आहेत. प्रत्येकाने कंगनाचा क्लास घ्यायला सुरुवात केली.

https://twitter.com/KanganaTeam/status/1385850715818631169

या पोस्टवर कमेंट करत एक युजरने लिहिले, “कंगनाचे कोणते चाहते याचे समर्थन करतील का? मला तर विचित्र वाटते.” तिच्या एका चाहत्याने लिहिले, “कंगना, अशाप्रकारचे ट्वीट नको करू, यामुळे तुझ्या प्रतिमेला हानी पोहचत आहे. ही विनंती आहे. आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आम्ही तुला कोणत्याही अडचणीमध्ये नाही पाहू शकत.”

याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले, “नाही, हे ट्वीट योग्य नाही, तिला हे ट्वीट डिलीट करायला सांगा.”

जेव्हा चाहत्यांनी या कमेंटचे अत्यंत आक्षेपार्ह म्हणून वर्णन केले, तेव्हा कंगनाने यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, “शी-मॅन होणे ही एक वाईट गोष्ट आहे? ही एक कठोर गोष्ट आहे. मला वाटते की हे तिच्या टफ लूकसाठी कॉम्प्लिमेंट आहे. तुम्ही लोक नेहमीच नकारात्मक विचार का करता मला समजत नाही.”

https://twitter.com/KanganaTeam/status/1385919041026633734

कंगना आपल्या आगामी ‘थलायवी’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील गाणेही रिलीझ झाले आहे. दुसरीकडे तापसी पन्नू ‘लूप लपेटा’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना जाईना! ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला आठवतायत महामारीच्या पूर्वीचे दिवस, फोटो शेअर करत म्हणाली…

-‘सनी लिओनीचे व्हिडिओ पाठवू का?’ म्हणणाऱ्या युजरला अभिनेत्री राजेश्वरी खरातचे खडेबोल, म्हणाली…

-स्त्री- पुरुषातील भेद संपवत मराठमोळ्या अभिनेत्याने धोतर म्हणून नेसली साडी, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

हे देखील वाचा