Tuesday, July 9, 2024

किम कर्दाश‍ियानची हॉटनेस पुन्हा एकदा चर्चेत! स्किन कलरच्या बिकिनी फोटोने केला सोशल मीडियावर राडा

रियॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाश‍ियान आपल्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत राहत असते. किम अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. त्याचबरोबर चाहत्यांनाही तिचे फोटो आवडतात आणि चाहते तिला भरभरून प्रतिसाद देतात. अशा परिस्थितीत, किम पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

किम कर्दाश‍ियानने नुकताच तिचा बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील किमचा बोल्ड अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. तिने स्किन कलरच्या बिकिनीसह गॉगल घातला आहे. आता किमचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. किमने हे बोल्ड फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “मला परत घेऊन चल.”

किमने तिचे बोल्ड फोटो शेअर करत, नेटकऱ्यांचे लक्ष वेधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही किमने अनेक वेळा बिकिनीमध्ये तिचे हॉट फोटो शेअर केलेले आहेत. त्याचबरोबर तिचे फोटो यापूर्वीही बर्‍याचदा व्हायरल झाले आहेत. किमचा सोशल मीडिया तिच्या बोल्ड फोटोंनी अक्षरशः भरलेला आहे.

काही काळापूर्वी किमने एका कोर्टामध्ये कान्येपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला होता. वृत्तानुसार, किमने फक्त घटस्फोटासाठी अर्जच केला नाही, तर आपल्या चार मुलांची संयुक्त कोठडीही मागितली. किमच्या वतीने वकील लॉरा वासेर हे कायदेशीर प्रकरण पाहतील, असे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोघांमधील नातं काही काळापासून व्यवस्थित चालत नव्हते आणि दोघे एकमेकांपासून विभक्त राहत होते. किम आणि कान्ये यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. दोघांचा हा लॅविश विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा