Monday, July 8, 2024

पूनम पांडेने सांगितली कौटुंबिक हिंसाचाराची व्यथा; लोक म्हणतात, ‘ती असे कपडे घालते, तर तिच्यासोबत…’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) रियॅलिटी शो ‘लॉक अप’ ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर प्रसारित होणार आहे. शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची जीवनकहाणी उघडली जाईल. या शोमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेही (Poonam Pandey) दिसणार आहे. ज्याचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तुरुंगात कैद झालेली दिसत आहे. बोल्ड अभिनेत्री पूनम तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत असते.

काही काळापूर्वी तिने पती सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि गुन्हाही दाखल केला होता. आता ती सॅमपासून वेगळी झाली आहे. जेव्हा पूनमने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले तेव्हा तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. पूनम पांडे खऱ्या आयुष्यात कशी आहे हे लोकांना माहीत नाही, असे ती म्हणते. या शोमध्ये ती चाहत्यांना स्वतःबद्दल सांगणार आहे.

मिळाले एक उत्तम व्यासपीठ
पूनमचा असा विश्वास आहे की, प्रेक्षक तिला तिच्या बोल्ड ॲक्टमुळे ओळखतात. पण खऱ्या आयुष्यात तिने काय सामना केला याची कथा अजून समोर आलेली नाही. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, “लोकांना वाटते की मी नेहमीच वादात असते. आयुष्यात माझ्याकडून चुका झाल्या हे मी नाकारत नाही. मलाही त्याचा पश्चाताप होतो. लोकांनी मला ओळखावे अशी माझी इच्छा आहे. मला समजून घ्या. मला लॉकअपच्या रूपाने मोठे व्यासपीठ मिळाले आहे.”

लोकांनी सांगितल्या वेगवेगळ्या गोष्टी
पूनम म्हणते की, “जेव्हा मी घरगुती हिंसाचाराचा सामना करत होते तेव्हा मी ट्विटरवर ट्रेंड करत होते. मी एका न्यूज चॅनलवर पाहिलं, जिथे दोन प्रकारचे लोक वाद घालत होते. एका बाजूचे लोक म्हणाले की, ती असे कपडे घालते, ती असे वागते, तिच्यासोबत हे असंच व्हायला पाहिजे होतं. तर दुसऱ्या बाजूचे लोक म्हणाले, ते काहीही असो पण तिच्यासोबत असे का झाले? हे कोणाच्याही बाबतीत घडू नये, मला कळत नाही की लोक त्या व्यक्तीचा मुद्दा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीत.”

वाद निर्माण केल्याचे केले मान्य
पूनमने पुढे कबूल केले की, काम मिळत नसताना तिने वाद निर्माण केला. ती म्हणते की, ती त्यावेळी लहान होती. त्यामुळे तिला करिअर करण्यासाठी कोणीही काहीही सांगितले, ते तिने डोळे बंद करून केले. नंतर तिला समजले की, ती चुकीची आहे. आता तिला फक्त काम करायचे आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा