‘मिस युनिव्हर्स २०२०’ च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मिस मेक्सिको अँड्रिया मेझा हिने या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताची एडलिन कॅस्टेलिनो ६९ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिसरी उपविजेती ठरली. एडलिन भलेही ताज (विजेतेपद) जिंकू शकली नाही, परंतु स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत तिने लाखो मने जिंकली. तिला लॉकडाऊनच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. आता तिच्या उत्तराचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
असे दिले तिने उत्तर
एडलिनला विचारले गेले होते की, “अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊन देत, देशात लॉकडाऊन लावावे की आपल्या सीमा खुल्या करत संसर्गाचे प्रमाण वाढू द्यावे?” यावर एडलिनने उत्तर दिले, “मी याच कारणास्तव भारतातून आली आहे. याक्षणी भारत ज्या संकटाचा सामना करत आहे, यावरून मला एक बाब समजली की, तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याव्यतिरिक्त इतर काहीही महत्वाचे नाही. तुम्हाला अर्थव्यवस्था आणि आरोग्य दोन्हीमध्ये समेट करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य होऊ शकते, जेव्हा सरकार लोकांच्या खांद्याला खांदा लावून असे काहीतरी करेल जे अर्थव्यवस्थेलाही मदत करेल.”
https://www.instagram.com/p/CPBd6MQL_jT/?utm_source=ig_web_copy_link
साडी परिधान करून केला रॅम्प वॉक
तिसरी उपविजेती ठरलेली एडलिन कॅस्टेलिनोने राष्ट्रीय पोशाख फेरीमध्ये साडी परिधान केलेली दिसली. या फेरीत, स्पर्धक त्यांच्या देशाचा पारंपारिक पोशाख सादर करतात. अशा परिस्थितीत एडलिनने साडी नेसून रॅम्प वॉक केला. तिने गुलाबी रंगाच्या साडीवर जड दागिने घालून आपला लूक पूर्ण केला होता.
मूळची आहे कुवैतची
सन १९९८ मध्ये जन्मलेल्या एडलिनने ‘लिवा मिस डिवा युनिव्हर्स २०२०’ स्पर्धा जिंकली होती आणि यावर्षी ती मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताची प्रतिनिधी म्हणून दिसली. एडलिन मूळची कुवैतची आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ती वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आली होती. तिचे पालक कर्नाटकचे आहेत. याशिवाय ती शेतकर्यांशी संबंधित सामाजिक कारणांसाठी देखील काम करते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ