Thursday, July 18, 2024

हास्यामागे आपल्या जीवनातील मोठे दुःख लपवणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला कॉमेडीयनची दुःखद कहाणी

हिंदी चित्रपट जगतात पहिल्यापासून पुरूष कलाकारांचेच वर्चस्व राहिले आहे. आत्ता चित्रपट जगतात ज्याप्रमाणे सलमान खान, शाहरुख खान, आमीर खान या खान मंडळींचे वर्चस्व राहिले आहे त्याप्रमाणेच आधीच्या काळातही चित्रपट जगतावर पुरूष कलाकारांची सत्ता होती. मात्र ज्या काळात फक्त पुरूष मंडळीची कॉमेडियन म्हणून चर्चा होती त्या काळात पहिली महिला कॉमेडियन म्हणून एका अभिनेत्रीने ४० ते ७० च्या दशकात नाव कमावले होते. टुन टुन (Tun Tun) असे या अभिनेत्रीचे नाव होते. पाहूया या अभिनेत्रीबद्दलचे न ऐकलेले किस्से. 

40 ते 70 च्या दशकात बॉलीवूडमध्ये  टुनटुन  यांचा  दबदबा होता. विनोदी कलाकार म्हणून त्यांनी खूप नाव कमावलं. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने  आणि  विनोदाच्या खास शैलीमुळे टुनटुन आजही सिनेप्रेमींच्या हृदयात जिवंत आहेत, पण पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या टुनटुनचे खरे आयुष्य खूप वेदनादायी होते. टुनटुन यांचे खरे नाव उमा देवी खत्री (Uma Khatri) होते. त्यांचा जन्म १९२३ मध्ये अमरोहा, उत्तर प्रदेश येथे झाला. लहानपणापासूनच त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, टुनटुन यांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या.

लहानपणीच त्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवले होते त्या लहान असतानाच त्यांच्या आई- वडिल आणि भावाची हत्या झाली होती. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली. टुन टुन यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी अडीच वर्षांची असताना माझ्या आई-वडिलांचे निधन झाले.’

कुटुंब सोडल्यानंतर, टुनटुन अत्यंत गरिबीत दिवस काढत होत्या. त्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी अलिपूरहून पळून मुंबईत आल्या. येथे त्यांनी संगीतकार नौशाद यांचे घर गाठले आणि त्यांना सांगितले की, मला गाणे येते, तुम्ही मला काम द्या, नाहीतर मी समुद्रात उडी मारून जीव देईन. नौशादने त्यांना संधीही दिली, पण फारसे यश न मिळाल्याने नौशादने त्यांना अभिनय करण्याचा सल्ला दिला आणि दिलीप कुमार यांच्या ‘बाबुल’ (१९५०) या चित्रपटात काम मिळाले. इथून तिचं नाव उमा देवीवरून बदलून टुनटुन झालं. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले. या संघर्षाच्या आयुष्यातही टुनटुन यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी दर्द, गीत, बाबुल, दुनिया या चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा