विद्या बालन बॉलीवूडची सर्वात प्रभावशाली अभिनेत्री आहे. तिला नेहमीच तिच्या कामासाठी ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याने बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.
त्यातही २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातून विद्याने तिच्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. ही बाजू पाहून सर्वजण थक्क झाले होते.
पण हा चित्रपट साइन करताना अनेकांनी मला वेड्यात काढले होते. असा खुलासा विद्या बालनने एका मुलाखतीत केला होता. ‘द डर्टी पिक्चर’मध्ये विद्याने दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारली होती.
विद्या बालन म्हणाली की, ‘ज्या क्षणी मी चित्रपटाची दिग्दर्शक मिलनला भेटले. त्याच क्षणी मला त्यांच्यावर विश्वास बसला होता. मला ठाऊक होते की त्या भूमिकेचे एक विशिष्ट सौंदर्य आहे आणि ते अजिबात कमी दर्जाचे नाही.’
ती पुढे म्हणाली की, ‘या प्रोजेक्टमध्ये एकता कपूरसुद्धा सहभागी होती आणि तीसुद्धा एक महिला आहे. माझ्या करिअरची सुरुवात एकता कपूरमुळे झाली. मी तिला चांगली ओळखते.’
त्यामुळे चित्रपटातील व्यक्तीरेखेविषयी मला काही शंका नव्हत्या. पण असे अनेक लोक होते ज्यांनी मला अक्षरश: वेडे ठरवले होते. अशी भुमिका तु करू शकत नाहीस.
तुझ्या प्रतीमेला धक्का पोहोचेल असे अनेकजण म्हणत होते. त्यामूळे मी ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट करण्यापूर्वी आई-वडिलांना त्याबद्दल विचारले होते. त्यावेळी तुला जे योग्य वाटेल ते कर. असे म्हणत त्यांनी मला पाठिंबा दिला.
‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीनन्स होते. त्यामूळे देखील विद्या बालनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एवढेच नाही तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी विद्याला नावे देखील ठेवली होती.
पण विद्याने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. तिने चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण केले. विद्या बालनच्या मते तिने ‘द डर्टी पिक्चर’ चित्रपटामध्ये निभावलेली सिल्क स्मिताची तिची सर्वात आवडती भुमिका आहे.
सिल्क स्मिताची भूमिका साकारण्याबाबत विद्या ठाम होती. मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटामुळे विद्याच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले. या चित्रपटातील अभिनयासाठी विद्याला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.
इश्किया’, ‘द डर्ट्री पिक्चर’ आणि ‘कहानी’ या चित्रपटानंतर विद्याने बॉलिवूडमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. विद्याच्या या तीनही उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये होतो.