Friday, July 5, 2024

इरफान खानची अभिनेत्री सबा कमरच्या अडचणीत वाढ; पाकिस्तानातील कोर्टाने अटक वॉरंट केले जारी

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर अनेकदा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. अशात तिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पाकिस्तानातील लाहोर मॅजिस्ट्रेट कोर्टाने गायक बिलाल सईद आणि इरफान खान यांच्यासोबत ‘हिंदी मीडियम’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री सबाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वाॅरंट बुधवारी (८सप्टेंबर) जारी करण्यात आले. माध्यमांतील वृत्तांनुसार, लाहोरमधील ऐतिहासिक मशिदीत डान्सचा व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची ६ ऑक्टोबरला होणार सुनावणी
माध्यमांतील वृत्तांनुसार, लाहोरमधील दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री सबा कमर आणि गायक बिलाल सईद यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले, ते न्यायालयीन सुनावणीत सतत हजर राहत नव्हते. यासह न्यायालयाने पुढील सुनावणीसाठीची तारीख ६ ऑक्टोबर निश्चित केली आहे. गेल्या वर्षी लाहोर पोलिसांनी सबा आणि बिलाल  यांच्याविरोधात कायद्यातील नियमांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी दोन अधिकार्‍यांना केले निलंबित
एफआयआरनुसार, सबा आणि बिलाल यांनी मशिदीसमोर डान्सचा व्हिडिओ शूट केला होता. या घटनेवर पाकिस्तानच्या जनतेनेही नाराजी व्यक्त केली होती. पंजाब प्रांत सरकारने या संदर्भात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले होते. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सबा आणि बिलाल यांनी माफीही मागितली होती.

सबा कमरविषयी बोलायचं झालं, तर ती पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे. ती ‘उडान’, ‘मैं औरत हूं’, ‘धूप में अंधकार है’ आणि ‘जिन्ना के नाम’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. याशिवाय, सबाने ‘मंटो’, ‘लाहोर से आगे’ सारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. सबा कमरने इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अभिनेत्री म्हणून नामांकित करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

-नेहा कक्कर आहे गरोदर? ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये देणार गोड बातमी

-‘लक्ष वेधण्यासाठी कपडे काढणे, हा माझा अजेंडा नाही’, म्हणत निया शर्माने ट्रोलिंगवर सोडले मौन

हे देखील वाचा