Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड सारा अली खानचा लेहंगा-चोळी पाहून गोंधळले नेटकरी! ‘नेमकं घातलंय कसं?’ म्हणत उडवली खिल्ली

सारा अली खानचा लेहंगा-चोळी पाहून गोंधळले नेटकरी! ‘नेमकं घातलंय कसं?’ म्हणत उडवली खिल्ली

नुकतेच, सारा अली खानने मनीष मल्होत्राच्या सुंदर ट्रॅडिशनल आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. समोर आलेल्या तिच्या एका फोटोमुळे नेटकरी गोंधळून गेले आहेत. फोटोत साराने लेहंगा-चोळी परिधान केलेली पाहायला मिळत आहे. आयसी मिंट आउटफिटमध्ये सारा पाठीच्या बाजूने पोझ देत आहे. ब्लाउज मागच्या बाजूने पूर्ण खुले आहे. तिचा हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

सारा अली खानने जे ब्लाऊज परिधान केला आहे, त्याचा बॅक स्किन कलरचा आहे. त्यामुळे, फोटोत असे दिसते की, तिची संपूर्ण पाठ उघडी आहे आणि फक्त स्लीव्ह्ज व पुढील भाग झाकलेला आहे. तथापि, या ड्रेसमध्ये तिचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर होत आहे. जो पाहून सहज लक्षात येते की, ब्लाऊजच्या मागच्या बाजूस एक स्किन कलर फॅब्रिक आहे.

तिचा हा फोटो पाहून युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. बरेच युजर्स तर या आऊटफिटची चेष्टाही करत आहेत. काही म्हणत आहेत, याला कसं घातलंय. त्याचबरोबर काही लोक साराच्या या लुकचे कौतुक करत आहेत.

या आऊटफिटमध्ये साराचे बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. तिने मनीष मल्होत्राने बनविलेल्या अनेक फॅशनेबल आउटफिट्ससाठी मॉडेलिंग केले आहे. यापूर्वी तिचे ‘नूरियत’ सीरिजचे फोटोही व्हायरल झाले आहेत. होळीच्या दिवशी सारा सैफ अली खान आणि करीनाच्या नवीन घरात पार्टी करण्यासाठी गेली होती.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सारा अली खान ‘अतरंगी रे’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल रॉय आहेत. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तसेच, यावर्षी ऑगस्टमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तिचा अंदाजच निराळा! अभिनेत्री मलायका अरोराने भिंतीवर ‘हा’ योगा करून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-ऋतिक रोशनसोबत केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात, बनली वयाच्या १७ व्या वर्षी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

हे देखील वाचा