Wednesday, July 16, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानची लाडकी लेक लावतेय चाहत्यांना वेड, पर्पल आऊटफिटमध्ये पाहा तिचा बोल्ड अंदाज

शाहरुख खानची लाडकी लेक लावतेय चाहत्यांना वेड, पर्पल आऊटफिटमध्ये पाहा तिचा बोल्ड अंदाज

बॉलिवूड किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. सुहाना खान नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अशा परिस्थितीत, सुहानाने पुन्हा एकदा काही फोटो आणि एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.

सुहाना खानने इंस्टाग्रामवर दोन फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. सुहानाने या पोस्टमध्ये जांभळ्या रंगाचा बॉडीकॉन परिधान केला आहे. यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. एकीकडे व्हिडिओमध्ये सुहानाच्या चाहत्यांना तिची अदा आवडत आहे, तर दुसरीकडे तिची मैत्री व्यक्त करण्याची स्टाईलही चाहत्यांनी पसंत केली आहे.

सुहानाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही सुहानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सुहानाचा देसी अंदाज असो किंवा ग्लॅमरस असो, चाहत्यांना नेहमीच तिची स्टाईल आवडते.

बर्‍याचदा असे वृत्त आले आहे की, सुहाना खान शिक्षण संपल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. त्याचवेळी, सुहानाचे वडील म्हणजेच शाहरुख खान नेहमीच या प्रश्नावर म्हणतो की, सुहानाला ज्यात आवड असेल, ती त्याच क्षेत्रात तिची कारकीर्द बनवेल.

विशेष म्हणजे शाहरुख खानही या दिवसात चर्चेत आहे. ‘झिरो’ चित्रपटाच्या बर्‍याच दिवसानंतर, शाहरुख खान आता पुनरागमन करत आहे. शाहरुख खानचा पुढचा चित्रपट ‘पठाण’ आहे. ‘पठाण’मध्ये शाहरुख पुन्हा दीपिका पदुकोणबरोबर मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याचवेळी जॉन अब्राहम देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माणुसकीचे उत्तम उदाहरण! मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने दिले घुबडाला जीवनदान; सर्वत्र होतंय कौतुक

-हॉटेल रूममध्ये एकटीच असलेली सनी लिओनी अचानक मारू लागली बेडवर उड्या; चाहत्यांकडून व्हिडिओला मिळतंय भरभरून प्रेम

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

हे देखील वाचा