Saturday, July 6, 2024

‘बाथरूममध्ये तुम्हाला इतका वेळ का लागतो?’, युजरच्या विचित्र प्रश्नाला शाहरुख खानचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान उत्तम अभिनय आणि त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखला जातो. बरेच पुरस्कार सोहळे आणि मुलाखतीदरम्यान त्याचा विस्मयकारक सेन्स ऑफ ह्युमर दिसून आला आहे. शाहरुखने बुधवारी (३१ मार्च) ट्विटरवर हॅशटॅग आस्कएसआरके सत्राचे (#AskSRK session) आयोजन केले होते. यात चाहत्यांनी त्याला बरेच मजेदार प्रश्न विचारले आणि किंग खानने देखील तितकीच रंजक उत्तरे दिली.

या सत्रादरम्यान, शाहरुखला चित्रपटांपासून ते त्याच्या अंडरगार्मेंट्सपर्यंतचे प्रश्न विचारले. शाहरुखने चाहत्यांना प्रत्युत्तरही दिले. एका युजरने शाहरुखला विचारले की, “तुम्ही बाथरूममध्ये इतका वेळ का घालवता, तिथे तुम्हाला असे काय करावे लागते?” यावर शाहरुखने उत्तर दिले, “मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेल. तुमची उत्सुकता आणि शिकण्याची तीव्र इच्छा हृदयस्पर्शी आहे.”

दुसऱ्या ट्विटर युजरने त्याला त्याच्या अंडरवेअरचा रंग देखील विचारला. त्यावर शाहरुखने उत्तर दिले की, “मी अशाच वर्ग आणि एज्युकेटेड प्रश्नांसाठी आस्कएसआरके सेशन करतो.” पुढे शाहरुखला त्याच्या मित्रांसंबंधित एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने त्याच्या मुलांना त्याचे मित्र म्हणून वर्णन केले.

किंग खानचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी खूप उत्सुक आहे. यामुळे आस्कएसआरके सेशनमध्ये, त्याला सर्वाधिक प्रश्न मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी विचारण्यात आले. शाहरुख खान अखेरच्या वेळी, 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-किम कर्दाश‍ियानची हॉटनेस पुन्हा एकदा चर्चेत! स्किन कलरच्या बिकिनी फोटोने केला सोशल मीडियावर राडा

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा