Wednesday, June 26, 2024

बिग बॉसची माजी कंटेस्टेंट थिरकली ‘विलायती शराब’वर; पाहा कॅनडाच्या रस्त्यावरील शहनाजचा जबरदस्त डान्स व्हिडिओ

‘बिग बॉस 13’ पासून शहनाज गिलने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. तिने या शोद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आताही चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती तिचे फोटो आणि मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. ती सध्या तिच्या ‘हौसला रख’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडामध्ये आहे. तिच्यासोबत तिथे सोनम बाजवा आणि दिलजीत दोसांझ आहेत. शहनाजने शूटच्या दरम्यानचा एक गमतीदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती नाचताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शहनाजने शुक्रवारी (26 मार्च) इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती कॅनडाच्या रस्त्यावर  दर्शन रावल आणि नीती मोहनच्या ‘विलायती शराब’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. “विलायती शराब आवडली” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. यासह, तिने अनेकांना यावर रील्स बनवण्यासाठी टॅगही केले आहे.

या व्हिडिओमध्ये शहनाजने व्हाइट टॉप आणि बॅगी पॅन्ट घातली आहे. या ड्रेसमध्ये शहनाजने तिचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

त्याचबरोबर दिलजीत दोसांझही आपल्या पंजाबी आगामी चित्रपटाचे फोटो शेअर करत असतो. हा चित्रपट येत्या 15 ऑक्टोबर 2021 रोजी रिलीज होणार आहे.

शहनाज गिल ही अभिनेत्री, मॉडेलसह एक गायिकाही आहे. तिने तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात 2015 च्या संगीत व्हिडिओ ‘शिव दि किताब’ पासून केली. 2017 मध्ये, तिने ‘सत श्री अकाल इंग्लंड’ या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. सप्टेंबर 2019 मध्ये शहनाजने बिग बॉस 13 या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला, जिथे ती तिसऱ्या स्थानावर राहिली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-भोजपुरी स्टार राकेश मिश्राने केला अक्षरा सिंगसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर, सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा