Friday, July 5, 2024

आलियानंतर आता श्रद्धा कपूरही बनली ‘जलपरी!’ शेअर केला अंडरवॉटर व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून अनेक अभिनेत्रींचे अंडरवॉटर फोटो आणि व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धा मालदीवमध्ये पाण्याखाली पोहताना दिसत आहे.

नुकताच श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की, श्रद्धा कपूर अगोदर समुद्राच्या दिशेने जात आहे आणि त्यानंतर ती समुद्राच्या आतही जाते. यानंतर व्हिडिओमध्ये ती पाण्यात पोहताना दिसत आहे. श्रद्धाच्या या अंडरवॉटर व्हिडिओमध्ये बरेच रंगीबेरंगी मासेही पाहायला मिळत आहेत.

श्रद्धाने हा अंडरवॉटर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाण्याखालील आयुष्य.” यासोबत श्रद्धाने हा व्हिडिओ मालदीवचा असल्याचेही सांगितले आहे. अवघ्या अर्ध्या तासात श्रद्धाच्या व्हिडिओवर 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्स करून चाहते श्रद्धाचे आणि व्हिडिओचेही कौतुक करत आहेत.

अलीकडेच, हिना खान आणि आलिया भट्टचेही पाण्याखाली पोहतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. तसेच, हिना खान सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत वेळ घालवत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर श्रध्दा अखेर ‘बागी 3’ चित्रपटात दिसली होती. लॉकडाऊन होण्यापूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत दिसली होती. ‘बागी 3’ पूर्वी श्रद्धा कपूर ‘स्ट्रीट डान्सर 3 डी’ चित्रपटात दिसली होती. सध्या श्रद्धाकडे लव्ह रंजनचा पुढचा चित्रपट असून, त्यामध्ये ती रणबीर कपूर रोमांस करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ही तर जलपरी’, आलिया भट्टचा अंडरवॉटर बिकिनी फोटो पाहून चाहत्यांची झक्कास प्रतिक्रिया

-अभिनेत्री पूजा बेदीच्या ‘या’ कंडोम जाहिरातीने उभा ठाकला होता वाद, दूरदर्शनवर केली होती बंद, पाहा बोल्ड फोटो

-निया शर्माचे बाथटबमधील फोटो करतायत सोशलवर धमाल, प्रेक्षकांचा मिळतोय भरभरून प्रतिसाद

हे देखील वाचा