Monday, July 8, 2024

सुशांतच्या गोड आठवणी! होळीदरम्यानचा थ्रोबॅक व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

गेल्या वर्षी जूनमध्ये बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता सुशांतसिंग राजपूतने या जगाचा निरोप घेतला होता. आज सुशांत सिंग राजपूत आपल्यात नसला तरीही त्याचे चाहते सोशल मीडियावर त्यांच्या हिरोची आठवण नेहमी काढत असतात. होळीच्या खास निमित्ताने सुशांतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, हा व्हिडिओ सुशांतसिंग राजपूत आणि जॅकलिन फर्नांडिसचा आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत आणि जॅकलिन ‘सिलसिला’ या चित्रपटाच्या सुपरहिट ‘रंग बरसे’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सुशांत आणि जॅकलिनचा हा थ्रोबॅक व्हिडिओ मुंबईतील होळी पार्टीचा आहे.

सुशांत आणि जॅकलिन ‘ड्राइव्ह’ चित्रपटात एकत्र दिसले होते. चित्रपटाला काही खास कामगिरी करता आली नाही. पण सुशांतची डॅशिंग स्टाईल चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी चांगलीच पसंत केली. या पार्टीत सुशांतने सांगितले होते की, त्याला या होळी पार्टीत बर्‍याच दिवसांपासून यायचे होते, पण आता ती संधी मिळाली.

सुशांतचा आणखी एक होळी व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तो अंकिता लोखंडेसह दिसला आहे. एका छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुशांत अंकितासोबत हसताना दिसला. सुशांत आणि अंकिता बर्‍याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर ते दोघे वेगळे झाले आणि सुशांत रिया चक्रवर्तीसोबत नात्यात आला.

सुशांत अखेर ‘दिल बेचारा’ चित्रपटात दिसला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट त्याच्या निधनानंतर रिलीझ झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. सुशांत अभिनित चित्रपट ‘छिछोरे’ ला 67 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात सुशांतसोबत श्रद्धा कपूर, वरुण शर्मा आणि ताहिर राज भसीन दिसले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लहान मुलांनी प्रियांकाच्या अंगावर चक्क पाण्याने भरलेली बादली केली होती रिकामी, निक बघतच राहिला; थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘होळी पार्टीमध्ये एका व्यक्तीने माझ्या स्कर्टमध्ये हात…’, बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा