Saturday, July 6, 2024

‘तुझ्याने नाही होणार’, हिना खानने बोल्ड व्हिडिओ पोस्ट करताच चाहत्यांच्या विचित्र कमेंट्स

‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेतून आपल्या अभिनयाच्या जोरावर हीना खानने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. हिना आपल्या अभिनायाप्रमाणे तिच्या हॉट आणि सेक्सी लूकमुळे प्रचंड चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो प्रचंड व्हायरल होत असतात. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षण ती नेहमीच शेअर करत असते. तिचे अनेक बोल्ड फोटो चर्चेचा विषय बनत असतात.

हिनाला बिग बॉस मधील सर्वात निर्भीड महिला स्पर्धक म्हणून ओळखली जाते. तिने हे आपल्या सिद्ध केले आहे. तिने बिग बॉसच्या अकराव्या पर्वात तिच्या उत्कृष्ट खेळीने अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. सध्या ती आपल्या एका नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या फॅन अकाउंटवर शेअर केला आहे. याततील तिची किलर स्टाईल हा तिच्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. आपल्या वेगवेगळ्या डान्सच्या मुव्हने चाहत्यांना ती आकर्षित करत आहे. तिचा हा लूक काहींच्या पसंतीस उतरला नाहीये. काहींनी तिच्या या लूकवर वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींना तिचा हा लूक फारच भावला आहे.

या व्हिडिओत हिनाने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत, त्यावर तिला चाहत्यांच्या विचित्र प्रतिक्रिया येत आहेत. एकाने तर तिच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया करताना लिहिले आहे की, ‘तुझ्याने नाही होणार.’ दुसरीकडे एका युजरला तिच्या लूकमधील सौंदर्य भलतेच पसंत पडले आहे.

हिनाचे इंस्टाग्रामवर १ कोटी १० लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या अनेक बोल्ड आणि ब्युटीफुल लूकने ती नेहमीच दिसत असते.

‘कसोटी जिंदगी की’ मधील कोमालिका हे पात्र आजही हिनाची आठवण करून देते. त्यानंतर ती ‘बिग बॉस’ मध्ये दिसली होती. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेने तिला विशेष ओळख करून दिली होती. त्यानंतर ती ‘खतरों के खिलाडीच्या’ आठव्या सिझनमध्ये दिसली होती. तिची ‘नागीण’ ही मालिका प्रचंड गाजली होती. सोबतच हिनाचे ‘सपना बाबूल का बिदाई’, ‘चांद छुपा बादल में’ हे कार्यक्रम देखिल विषेश गाजले.

तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘हॅक्ड’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा