Wednesday, January 14, 2026
Home भोजपूरी करवाचौथला भांगेत सिंदूर अन् कपाळावर टिकली लावून पारंपारिक लूकमध्ये दिसली मोनालिसा; लाल लेहंग्यात सपनाचाही जलवा

करवाचौथला भांगेत सिंदूर अन् कपाळावर टिकली लावून पारंपारिक लूकमध्ये दिसली मोनालिसा; लाल लेहंग्यात सपनाचाही जलवा

चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी करवाचौथ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यामध्ये भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आणि हरियाणवी अभिनेत्री सपना चौधरीचाही समावेश आहे. यादरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने यावेळेस करावाचौथ हा सण खूप जोरात साजरा केला आहे. तिच्या चाहत्यांना तिचा पारंपरिक लूक खूप आवडला आहे. तिचा पारंपरिक लूक पाहून तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. तसेच सोशल मीडियावर तिचे खूप कौतुक करत आहेत. मोनालिसाचे पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

यावेळी तिने कॉन्ट्रास्टमध्ये हिरवा रंगाचे स्लीव्हलेस ब्लाऊज आणि मस्टर्ड रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती. यासोबतच तिने भांगेमध्ये सिंदूर, कपाळावर लाल रंगाची टिकली, आणि गोल्डन रंगाचे गळ्यातले तसेच हातात बांगड्या घालून पारंपरिक लूक धारण केला होता.

अलीकडेच तिला तिच्या पतीपासून दूर राहून करवाचौथ सण साजरा करावा लागला. तिचा पती विक्रांत सिंग राजपूत यावेळी तिच्यासोबत नव्हता. त्यामुळे तिने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या पतीचा चेहेरा पाहून उपवास सोडला होता. आतापर्यंत तिने आपल्या चाहत्यांना बिकिनी लूक्स आणि वेस्टर्न लूकने चाहत्यांना खुश केले होते. मात्र आता पारंपारिक लूकनेही चाहत्यांना घायाळ केले आहे.

सपना चौधरीचा करवाचौथ
यासोबत हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरीने देखील धुमधडाक्यामध्ये करावाचौथ सण साजरा केला आहे. तिने तिचे करवाचौथचे फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये ती पती वीर साहूसोबत करावाचौथ रीतीरिवाजाने करताना दिसून येत आहे.

फोटोमध्ये दिसते की, सपना करवाचौथच्या दिवशी अगदी वधूसारखी तयार झाली आहे. तिने पूर्ण रीतीरिवाजाने उपवास ठेवला होता आणि आपल्या पतीच्याच हाताने उपवास सोडला. सोशल मीडियावर तिचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. तिच्या या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

लाल घागऱ्यामध्ये मोत्यांच्या दागिन्यांमध्ये सपना खूप सुंदर दिसत होती. मजेदार गोष्ट अशी की, जिथे चाहते सपनाचे कौतुक करत आहे, तर दुसरीकडे तिच्या पतीच्या लूकवर काही चाहते कमेंट करत आहेत. वीर हा मोठी दाढी आणि लांब केसांमध्ये दिसत आहे. चाहत्यांनी कंमेंटमध्ये असे लिहिले की, “ओसामा बिन लादेन म्हटले तर, चालेल का?” तसेच दुसऱ्या एकाने लिहले की, “हा तुझा पती आहे बाबा काळापासून.”

या पोस्टला चाहत्यांची जोरदार पसंती मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! ‘या’ भीतीमुळे भोजपुरी सुपरस्टार निरहुआ कधीच गेला नाही त्याच्या सासरवाडीत; स्वत:च केला खुलासा

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

हे देखील वाचा