साहिल गे असल्यामुळे पत्नीने दिला होता घटस्फोट? चित्रपटांपासून दूर असूनही आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक

चित्रपटसृष्टीमध्ये येऊन आपलं नावलौकिक करण्यासाठी अनेक लोक आपलं कलाकार होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईसारख्या शहरात येत असतात. अनेक कष्ट करून ते चित्रपटात काम देखील करतात पण काहींना यात यश मिळते, तर काहींना मात्र अपयशाला समोर जावे लागते. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आले, ज्यांच्यामध्ये हिरो बनण्याच्या सगळे गुण होते, पण ते यशस्वी अभिनेते बनू शकले नाहीत. याच यादीतील एक नाव म्हणजे साहिल खान. त्याने आपल्या जबरदस्त बॉडीने सगळ्या चाहत्यांची मने जिंकून घेतली होती.

प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करून देखील तो इंडस्ट्रीमध्ये त्याचे स्थान निर्माण करू शकला नाही. साहिल खानने त्याच्या करिअरची सुरुवात २००१ मध्ये केली. त्याने ‘स्टाईल’ या चित्रपटातून सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता शरमन जोशी मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील साहिल आणि शरमनची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. एकीकडे शरमन बॉलिवूडमधील एक हिट अभिनेता झाला, तर दुसरीकडे साहिल हळूहळू इंडस्ट्रीमधून गायब होऊ लागला. (style movie actor sahil khan real life controversy when he was called gay know lesser known facts about actor)

साहिल खानने त्याच्या करिअरमध्ये ‘एक्सक्यूज मी’, ‘ये है जिंदगी’, ‘डबल क्लास’ आणि ‘अलादिन’ यांसारख्या एकूण सात चित्रपटात काम केले आहे. परंतु या चित्रपटांची कहाणी काही खास नसल्याने चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त काही चालले नाही आणि हे सगळे चित्रपट फ्लॉप झाले. त्याचे सगळे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरही त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे तो खूप चर्चेत होता.

साहिल खानने २००४ मध्ये अभिनेत्री निगार खान हिच्याशी लग्न केले होते. परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या एक वर्षानंतरच साहिल आणि निगारने घटस्फोट घेतला. यानंतर जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफने ‘साहिल गे असल्यामुळे त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला,’ असा आरोप लावला होता.

तिने साहिलसोबत दोन प्रोडक्शन हाऊस कर्मा प्रोडक्शन आणि सायबर सिक्युरिटी फर्म चालू केले होते. ज्यातील सगळे पैसे साहिलने घेतले होते. त्याने ८ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप लावला होता. यासोबत आयेशाने हे देखील सांगितले होते की, “साहिल गे आहे त्यामुळे, ती त्याच्याशी घटस्फोट घेतला होता.”

या गोष्टीमुळे आयेशा आणि साहिलमध्ये अनेक दिवस वाद चालले होते. आयेशाने साहिलवर अनोळखी नंबरवरून फोन करून धमकी दिल्याचा आरोप लावला होता. या सगळ्यानंतर साहिल बॉलिवूडपासून दूर झाला आणि त्याने त्याची जिम चालू केली. त्यानंतर त्याने अनेक ब्रांच चालू केल्या. तो एका यूट्यूब चॅनेलवरून लोकांना फिटनेसचे सल्ले देत असतो. यासोबत साहिल खानचा मिनरल वॉटरचा व्यवसाय आहे. चित्रपटापासून लांब असूनही तो कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

-‘खिलाडी’ अक्षयमुळे उडाली कपिलची झोप; म्हणाला, ‘मी तर झोपलो नाही, प्रेक्षकांमधील काही लोक टॉयलेटसाठीही…’