सध्या बॉलिवूडमध्ये रिमेकचा पूर आल्याचे चित्र दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे किंवा हिंदी जुन्या सिनेमांचे रिमेक करण्याचा तडाखा लावला जात आहे. काही सिनेमाच्या घोषणा झाल्या आहेत तर काही लवकरच करण्यात येणार आहे. यातच मागील काही काळापासून शोमॅन सुभाष घई यांच्या सुपरहिट ‘राम-लखन’ चित्रपटाचा रिमेक होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अनेक बड्या दिग्दर्शकांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यानंतर स्वतः सुभाष घईच ‘राम-लखन’चा रिमक बनवणार असल्याचे सांगितले गेले. आता या सर्व बातम्यांवर सुभाष घई यांनी त्यांचे मत दिले आहे.
सुभाष घई हे ८० आणि ९० च्या दशकातील हिट मशीन म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक आहे. त्यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यांच्या या सुपरहिट सिनेमांमुळे त्यांना ‘शोमॅन’ ही पदवी देखील देण्यात आली. त्यांच्याकडे येणार प्रत्येक सिनेमा सुपरहिटच ठरला. मात्र मध्ये अशा बातम्या आल्या की, सुभाष घई दुसऱ्या प्रोडक्शन हाऊससोबत मिळून ‘राम-लखन’ सिनेमाचा रिमेक बनवणार आहे. मीडियासोबत बोलताना सुभाष घई यांनी सांगितले की, त्यांची आता असा कोणताही रिमेक बनवण्याची इच्छा नाही. त्यांच्याकडे काही नवीन कथा असून त्यावर काम सुरु आहे.
सुभाष घई यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी राम-लखन २’ बनवत नाही. आमच्या मुक्त आर्टस् कडून आमच्याच अनेक हिट सिनेमाचे हक्क आम्ही दुसऱ्यांना दिले आहेत. मला अनेक बॅनर्सने कर्मा, खलनायक,राम लखन आदी सिनेमाच्या राइट्ससाठी विचारणा केली आणि आम्ही ते त्यांना दिले आहेत. तेच या चित्रपटांचे रिमेक बनवतील. माझ्याकडे अनके कथा आहेत, ज्यांवर मला सिनेमे बनवायचे आहे. दुसऱ्या दिग्दर्शकांना माझ्या जुन्या सिनेमांचे रिमेक बनवायचे असतील तर त्यांचे स्वागत आहे.”
एका माहितीनुसार राम-लखन सिनेमाचा रिमेक दिग्दर्शक रोहित शेट्टी बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यात अनिल कपूर यांच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगल घेण्याचे चालू असून जॅकी श्रॉफ यांच्या भूमिकेसातही शोध सुरु आहे.
हेही वाचा :