मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेता म्हणून सुबोध भावेचे (Subodh Bhave) नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकांनी त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणाबद्दलही चांगलाच प्रसिद्ध आहे. अनेक विषयांवर तो जाहीरपणे आपले मत व्यक्त करत असतो. सध्या सुबोध भावे त्याच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे ज्यामध्ये त्याने राजकीय विषयावर आपले परखड मत व्यक्त केले आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दिनांक (१, ऑगस्ट रोजी) अभिनेता सुबोध भावे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपस्थित होता. या कार्यक्रमात लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या शतसूर्याचे तेज या नृत्य नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेला अभिनेता सुबोध भावेने यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात बोलताना सुबोध भावेने राजकीय विषयावर भाष्य केले.
यावेळी तो म्हणाला की, “आज आपण प्रत्येकजण चांगली नोकरी मिळवण्याच्या, परदेशात सेटल होण्याच्या मागे लागले आहोत. ज्या राजकीय लोकांची लायकी नाही अशांच्या हाती आपण देश घडवण्याचे काम दिले आहे. चांगला देश निर्माण करायचा असेल तर आपल्याला चांगले शिक्षण दिले पाहिजे. राजकारण्यांच्या हातात देश देऊन चालणार नाही, ते सगळे काय करत आहेत,” हे आपण पहातच आहोत असा खोचक टोलाही त्याने यावेळी लगावला.
देशाच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत असतानाच सुबोध भावेने व्यक्त केलेले हे विधान चांगलेच चर्चेत आले आहे. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगताना दिसत आहे.
हेही वाचा –
शेवटी जुळलंच! मल्हारचा गुंतला अंतरामध्ये जीव, जाहीरपणे देणार प्रेमाची कबुली
दोन लग्न अयशस्वी झाल्यावर ‘अशी’ जमली विद्या बालनशी जोडी, वाचा सिद्धार्थ रॉय कपूरची लाईफ स्टोरी