Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुबोध भावेने त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा करत शेअर केले पोस्टर, दिसणार ‘या’ भूमिकेत

काळ बदलला तशा अनेक गोष्टी बदलल्या. चित्रपटसृष्टी देखील याला अपवाद राहिली नाही. वेगवेगळ्या विषयांवर तयार होणारे सिनेमे कधी सत्य घटना, बायोपिक आदी पठडीबाहेरील विषयांकडे वळाले आपल्याला देखील समजले नाही. नेहमी प्रवाहापेक्षा वेगळे काही करणारा आणि हटके कलाकृती प्रेक्षकांसमोर आणणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. उभोधने त्याचं प्रत्येक कामातून मग ते सिनेमे असो, नाटकं असो किंवा मालिका स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

मराठीमधील देखणा, हरहुन्नरी आणि प्रतिभावान कलाकार म्हणून ओळखला जाणारा सुबोध भावे लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटातून, प्रत्येक भूमिकेतून अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर आणणारा सुबोध भावे नेहमी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयोग करत असतो. अशातच नुकतीच त्याने एक मोठी आनंदाची घोषणा केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आज त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली.

सुबोधने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून ‘फुलराणी’ या त्याच्या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. सुबोध लवकरच ‘फुलराणी’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “‘फुलराणी’ या माझ्या नवीन चित्रपटामध्ये आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय. तुमचे सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या! करोनाचे सर्व नियम पाळून चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे खूप समाधान आहे. २०२२ मध्ये आधी चित्रपटगृहांत आणि मग बाकी माध्यमांतून ‘फुलराणी’ प्रदर्शित करायचा मानस निर्मात्यांनी आणि फुलराणीच्या सर्व टीमने केला आहे. फुलराणीचे पहिले मोशन पोस्टर खास तुमच्यासाठी!’

या पोस्टरवर ‘फुलराणी’ अविस्मरणीय प्रेम कहाणी लिहिलेले आहे. या ब्लॅक अँड व्हाईट पोस्टरमध्ये सुबोध भावेचा रेट्रो लूक आपल्याला दिसत आहे. या पोस्टरमध्ये सुबोधसोबत एक अभिनेत्रीसुद्धा दिसत असली तरी ती पाठमोरी उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नाहीये. विशेष म्हणजे या चित्रपटात सुबोध एका रोमॅंटिक नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून, हर्षवर्धन साबळे, जय जोशी आणि अमृता राव हे चित्रपटाचे निर्माते आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा