मराठी अभिनेता सुबोध भावे (subodh bhave) सध्या जोरदार चर्चेत आहे. महाराष्ट्रातील राजकारणावर वादग्रस्त भाष्य केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या वक्तव्याला काहींनी प्रतिसाद दिला तर काहींनी मात्र कडकडून विरोध केला. अशातच त्याची आणखी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे, ही पोस्ट शेअर करून त्याने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे.
त्याने त्याच्या भाषणाचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. तसेच त्याने सगळ्यांचा गैरसमज झाला आहे असे देखील सांगितले. त्याने त्याच्या भाषणाचा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर करून तो नक्की काय बोलला होता हे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ऐकण्याची विनंती केली आहे. त्याने हा व्हिडिओ कुठेही न कट करता जसाच्या तसा शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “नमस्कार, काल माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने जो काही गोंधळ घातला आहे. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ. (कुठेही कट न करता जसाच्या तसा)
आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी या मताचा मी आहे. पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची. माझं संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटलं की माझं चुकलं तर मी मनापासून क्षमा मागतो. पण त्या आधी एकदा “संपूर्ण भाषण” त्याच्या अर्थासहित बघा तर एकदा.”
त्याच्या या व्हिडिओमधील लायकी नसलेल्या लोकांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे. हे वाक्य व्हायरल झाले होते. त्यावरून त्याला ट्रोल करण्यात आले होते. परंतु आता त्याने माफी मागितल्याने हे प्रकरण कुठे तरी शांत झाल्याचे दिसत आहे.
सुबोध भावेचा झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा शो सध्या चालू आहे. प्रेक्षकांचा या शोला जोरदार प्रतिसाद देखील मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
श्रद्धा आर्याने केला लव्ह लाईफचा खुलासा, पतीच्या ‘त्या’ गोष्टीत अडकलाय अभिनेत्रीचा जीव
सुभाष बी यांच्यावर दुःखाचा डोंगर: अर्ध्यात साथ सोडून पत्नी देवाघरी, आजारपणात सलमानने केली होती मदत