Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय सांगता! सुबोध भावेने अभिनयाला ठोकला रामराम? सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे खूपच अनोखे आणि घट्ट नाते आहे. आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार सोशल मीडियावर सक्रिय राहतात आणि सतत काही ना काही पोस्ट करतात. कलाकरांना त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टिंगमधून मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी देखील मिळते. सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या कामासंदर्भात, वैयक्तिक आयुष्यासंदर्भात विविध माहिती देत असतात. मात्र कधी कधी कलाकारांच्या विविध पोस्ट नेटकऱ्यांना, फॅन्सला गोंधळात टाकणाऱ्या, धक्कादायक देखील असतात.

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय हुशार, प्रतिभावान आणि जिवंत अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजनविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. नाटकं, मालिका, चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा सुबोध सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. तो सतत या माध्यमावर काही ना काही पोस्ट करत त्याची उपस्थिती दाखवत असतो. पण सुबोधने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्या फॅन्सच्या मनात एक मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून सुबोध अमेरिकेमध्ये आहे. आता त्याने सोशल मीडियावर त्याचा एक फोटो पोस्ट केला असून, हा फोटो त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काढला आणि शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या कडे ” विंडोज” बसवून मिळतील.” त्याचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर रिप्लाय करताना त्याला अनेक प्रश्न विचारले. काहींनी कमेंट्समध्ये सुबोधने अभिनयाला रामराम ठोकत मोयक्रोसॉफ्ट कंपनी जॉईन केल्याचे सांगितले आणि एकच धमाका झाला.

अशा प्रकारची कमेंट्स वाचून लोकांनी सुबोधवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. काहींनी तर त्याला असे करण्यामागचे कारण विचारत पुन्हा अभिनयात परतण्याची विनंती देखील केली आहे. मात्र असे काहीच नसून, सध्या सुबोध त्याचे प्रसिद्ध नाटक असलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत आहे. या दौऱ्यासाठी या नाटकाची संपूर्ण टीम अमेरिकेत असून, तिथे त्यांचे नाटकाचे यशस्वी जोरदार प्रयोग सुरु आहेत. १ एप्रिल ते १ मे या एक महिन्याच्या काळासाठी हा दौरा होणार आहे. या टीमच्या काही कलाकारांनी अमेरिकेतील प्रयोगाचे, या दौऱ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या नाटकाला अमेरिकेतही जोरदार प्रतिसाद मिळत असल्यामुळे नाटकाची टीम आणि सुबोध भावे खूपच खुश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा