Wednesday, July 3, 2024

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिलाषा जाणार मालिकेतून बाहेर? अभिनेत्रीच्या पोस्टने टाकलं गोंधळात

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत सध्या नवनवीन वळणं येत असून राधा सागर निभावत असलेल्या अभिलाषाचे खलनायिकी पात्रही चर्चेत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या राधा सागरने एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे आता राधा सागर मालिकेतून बाहेर पडणार का, असा चाहत्यांना प्रश्न पडलाय.

राधा सागरने पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. तिने लिहिलंय, ‘मला हे पात्र करायला मिळालंय यासाठी मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. त्याला न्याय द्यायचा मी प्रयत्न करतीये आणि करत राहीन. तूर्तास एवढेच. माझ्यावर आणि अभिलाषावर असेच प्रेम करत रहा. “कलर्स मराठी” चे मनापासून धन्यवाद.’ तिच्या पोस्टवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येतायेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा